ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्विकारणे ही प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र स्व‍िकारण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. परंतू दि.26 व 27 ऑक्टोबर 2024 (शनिवार व रविवार) या सुट्टीच्या दिवशी ही प्रक्रिया बंद राहणार आहे, याची नोंद सर्व इच्छुक उमेदवारांनी घ्यावी.
तसेच सोमवार, दि.28 ऑक्टोबर 2024 पासून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन अर्ज वाटप करण्यात येईल तसेच उमेदवारांचे अर्ज स्व‍िकारलेही जातील, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *