अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली होती. या टिकेनंतर नगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण होते तर जयश्री ठाकरेंच्या समर्थकांनी जाळपोळही केली होती. सर्वच स्तरातून वसंतराव देशमुखे यांच निषेध करण्यात आला होता. स्वता सुजय विखेंनीही जाहिरपणे या घटनेचा निषेध करून दिलगिरी व्यक्त केली.
वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांच्यावब गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, त्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते, ते नर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.
भाजप नेते वसंतराव देशमुखांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.
