माथेरान : सर्वांचा आवडती सण दिवाळी लवकरच येते असून हा सण साजरा करताना अनेकांची  आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी तसेच विधवा महिलांना तसेच अपंगांना हा सण साजरा करता यावा यासाठी येथील हॉटेल वे साईडचे मालक अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव हैदर अब्बास अल्ली पिरभोय यांच्या हस्ते हॉटेल वे साईड इन मध्ये गरजवंतांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये साखर, रवा,तेल, डालडा, बेसनपीठ या साहित्याचा समावेश आहे. अनेक गरजवंत विधवा महिलांनी याचा लाभ घेतला. अब्बास अली हुसेन पिरभोय गरजवंतांना साहित्याचे वाटप करत असतात.यावेळी अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्यासह हॉटेल व्यवस्थापक मेहमूद खान उपस्थित होते.

माथेरान साठी काहीना काही सढळ हस्ते मदत करण्यासाठी अब्बास अल्ली यांचा सिंहाचा वाटा असतो. येथील दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची त्यांची इच्छा असून हे पर्यटनस्थळ पब्लिक प्लेस असल्यामुळे इंग्रजी भाषेवर युवा वर्गाचे प्रभुत्व असावे यासाठी लवकरच आपल्या हॉटेलमध्ये मोफत इंग्रजी स्पिकिंग कोर्स सुरू करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *