मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील  उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता ९ उमेदवारांची तिसरी यादी शरद पवारांनी जाहीर केली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण ७६ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

 शनिवारी जयंत पाटील यांनी २२ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *