अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद
पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, बारामतीमधील निवडणुकीत चांगलीच चूरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार कुटुंबातच लढत झाली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत महाराष्ट्राने पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने फटकेबाजी केली, तसेच ते भावूक झाल्याचंही दिसून आलं.
लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास
आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही,
श्रीनिवास पवार यांनी अजितदादांचा दावा फेटाळला
पुणे : शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केलेला दावा श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या आईने युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवण्याला विरोध केला होता, हा अजित पवारांचा दावा त्यांचे सख्खे बंधू आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी फेटाळला.
दादांना सांगत होतो चूक करु नको. आपल्या आईने याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही, असं श्रीनिवास पवार म्हणालेत. त्याचबरोबर अजित पवारांनी आता लोकसभेला त्यांच्याकडून चुक झाल्याची किती वेळा कबुली दिली तरी युगेंद्र पवारांची उमेदवारी कायम राहणार असल्याचं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय.
अजित पवारांनी शरद पवारांवर घातलेला घाव आपण विसरणार नाही असं देखील श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. आपण लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांना समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. त्यामुळे आता माघारीचा प्रश्नच नाही असं श्रीनिवास पवार यांनी सांगितलं.