ठाणे :श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे ठाणे शहर, पालघर जिल्हातील बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील  बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी.

दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव उपक्रमा अंतर्गत २६ व २७ ऑक्टोंबर २०२४ पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील व जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय बोंडारपाडा आणि वागणपाड्यातील एकूण १५० आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. आदिवासी पाड्यांवर कोणतेही साधन नसताना गेली ६ वर्ष सत्यात काम करीत आहे व त्यातून अनेक रंग मुलांमधून फुलताना दिसत आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळे मध्ये जि.प. शाळा बोंडारपाडा शाळेचा तिसरा क्रमांक आला. जी परसबाग संस्थेने माहिती देत तेथील विध्यार्थी व शिक्षकांनी मेहेनत घुन ती निर्माण केली व त्याचे आज फलित मिळत आहे, तसेच ठाणे शहरातील वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, वागणंपाडा शाळेचे मुख्याध्यापक तवर सर व शिक्षक वर्ग आणि गावकरी कुटुंब उपस्थित होते तसेच संस्थेचे आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे, निशांत कोळी, स्नेहल गुळीक, चेतन जामगांवकर, रितिक राऊत, वसंत कुळेकर, नितीन कुळेकर, अभि कुळेकर तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *