44वी डब्ल्यूसीजी रिंक फुटबॉल स्पर्धा
मुंबई, 28 ऑक्टोबर: 44 व्या विलिंग्डन कॅथलिक जिमखाना (डब्ल्यूसीजी) वार्षिक रिंक फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत सेंट ब्लेझ ’ब’ (आंबोली) टीमने त्यांची सीनियर टीम सेंट ब्लेझ ’अ’ संघावर 5-1 असा सहज विजय नोंदवला
डब्ल्यूसीजी कोर्टवर फ्लडलाइट्सखाली खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत स्ट्रायकर सेबॅस्टियन आल्मेडाने दोन गोल करताना सेंट ब्लेझ ’ब’ च्या विजयात मुख्य भूमिका बजावली. श्रेयस झेले, रुस्टिन डी’कोस्टा आणि ख्रिस फर्नांडिसने प्रत्येकी एक गोल करून त्याला चांगली साथ दिली. सेंट ब्लेझ ‘अ’ संघाकडून एकमेव गोल एगन फर्नांडिसने केला.
उपांत्य फेरीच्या दुसर्या लढतीत, अवर लेडी ऑफ हेल्थ ‘अ’ (सहर) संघाने सेंट फ्रान्सिस झेवियरचा (कांजूर मार्ग) 4-2 अशा फरकाने पराभव केला. अवर लेडी ऑफ हेल्थकडून शफान सोलकर आणि इम्रान शेख यांनी प्रत्येकी दोन गोल केले. कांजूरमार्ग संघासाठी शोएब बेग आणि अरविंद राज यांनी गोल केले.
उपांत्य फेरीचे निकाल – पुरुष खुला गट: सेंट ब्लेझ ’ब’ आंबोली 5 (सेबॅस्टियन आल्मेडा 2, श्रेयस झेले, रस्टिन डी’कोस्टा, ख्रिस फर्नांडिस प्रत्येकी 1) विजयी वि. सेंट ब्लेझ ’अ’ आंबोली 1 (एगन फर्नांडिस) ;
अवर लेडी ऑफ हेल्थ ’अ’ सहार 4 (शफान सोलकर , इम्रान शेख प्रत्येकी 2) विजयी वि. सेंट फ्रान्सिस झेवियर, कांजूरमार्ग 2 (शोएब बेग, अरविंद राज प्रत्येकी 1) .
व्हेटरन्स पुरुष 40 वर्षांवरील: मॅकाबी 3 (मार्टिन डिसिल्वा, शॅनन रॉड्रिग्ज, कोझविल कार्डोझ प्रत्येकी 1) विजयी वि. एमवायजे ग्रीन 1(सुशांत चक्रवर्ती);
एमवायजे ऑरेंज 4 (जयेश नाईक 2, कृष्णा नायडू, एग्नेलो पिकार्डो प्रत्येकी 1) विजयी वि. वांद्रे पॅकर्स 0..
व्हेटरन्स पुरुष 50 वर्षांवरील: गोल्डन गनर्स 2 (जोनाथन फर्नांडिस 2) विजयी वि. अॅथलेटिको डी सेनर्स 0.
0000
