राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड विधानसभे मधे रंगत वाढणार, अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्या नंतर अनेक मात्तबरांच्या भुवव्या उंचावल्या मुळे खरी लढत कोणाकोणात होणार अशी चर्चा सध्या मतदारांमधे सुरु झाली आहे, अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले वडनेरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्व सामान्य जनतेची सेवा मनापासून केली असून एनवेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सुभाष पवार यांनी बंडखोरी केल्या नंतर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट )जाहीर प्रवेश केल्या मुळे पवार यांचे समर्थक शैलेश वडनेरे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने मतदानावर निश्चितच फरक पडणार असे,चित्र दिसून येत आहे, अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांना पाठिंबा देण्यासाठी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, हा जनसमुदाय मुरबाड माऊली गार्डन पासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत ढोल ताश्याच्या गजारात निघाल्या नंतर पोलीस प्रशासनानी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी पोलीस प्रशासनानी मोठया प्रमाणात मेहनत घेऊन,तैनात होते.
