मुंबई, 29 ऑक्टोबर: सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत पार्थ मगर याने 17 आणि 19 वर्षां खालील मुले आणि पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सेनहोरा डिसोझा आणि मानसी चिपळूणकर यांच्यात महिला एकेरीची फायनल रंगेल.

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत 17 वर्षांखालील मुले गटात पार्थने वेदांत अग्रवालवर 11-5, 11-5, 11-9 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. 19 वर्षांखालील गटात आगेकूच केली तरी सिद्धांत देशपांडेने त्याला 11-13, 11-4, 11-9, 13-15, 11-6 असे झुंजवले. पुरुष गटात पार्थने चुरशीच्या लढतीत मोहित वैष्णववर 11-4, 6-11, 11-7, 11-6 अशी मात केली.

महिला एकेरीच्या सेमी फायनलमध्ये सेनहोराने अंशिता ताम्हणकर 11-9, 15-13, 11-5 असे हरवले. मानसीने श्वेता पार्टे-नायकला 11-6, 11-7, 10-12, 13-15, 11-8 असे रंगतदार लढतीत पराभूत केले.

निकाल (सर्व उपांत्य फेरी) –11 वर्षांखालील मुली एकेरी: स्वरा गुडेकर विजयी वि. शनाया पारेख 11-3, 11-7, 11-7; अनैशा अभ्यंकर विजयी वि. आदिया अवधानी 11-9, 8-11, 11-5, 11-7.

11 वर्षांखालील मुले: यशन कोलाह विजयी वि. आदि शाह 11-5, 11-4, 9-11, 11-1; युवान सिंग वालिया विजयी वि. अव्यान सिंग वालिया 8-11, 11-7, 11-8, 11-7.

13 वर्षांखालील मुली,: नायरा लोढा विजयी वि. इन्सिया खरवाला 11-6, 11-3, 12-14, 11-8; अवंतिका आहुजा विजयी वि. अनैशा अभ्यंकर 11-8, 11-8, 9-11, 11-7.

13 वर्षांखालील मुले: कुश केजरीवाल विजयी वि. मल्हार तळवलकर 11-4, 8-11, 11-6, 11-2; अखिल कंपानी विजयी वि.यशन कोलाह 9-11, 9-11, 11-7, 11-6, 18-16.

15 वर्षांखालील मुली: सारा जामसुतकर विजयी वि. क्रिशा तन्ना 11-1, 11-3, 11-2; स्वरा गुडेकर विजयी वि. इन्सिया भावनगरवाला 11-7, 11-9, 11-8.

15 वर्षांखालील मुले: आदित्य दलाल विजयी वि. अर्णव वाघ 11-8, 11-4, 11-5; जहाँ कोलाह विजयी वि. साहिल मोहिते 11-9, 12-10, 11-4.

17 वर्षांखालील मुली: अंशिता ताम्हणकर विजयी वि. अर्पिता बोऱ्हाडे 11-8, 11-9, 11-7; मुग्धा देसाई विजयी वि. सारा जामसुतकर 11-4, 9-11, 11-9, 11-13, 11-5.

17 वर्षांखालील मुले: पार्थ मगर विजयी वि. वेदांत अग्रवाल 11-5, 11-5, 11-9; आदित्य दलाल विजयी वि. श्लोक झवेरी 13-11, 11-9, 11-7.

19 वर्षांखालील मुली: अंशिता ताम्हणकर विजयी वि. सारा जामसुतकर 8-11, 11-8, 11-5, 13-11; मुग्धा देसाई विजयी वि. शनाया पारीख 11-6, 11-6, 11-6.

19 वर्षांखालील मुले: पार्थ मगर विजयी वि. सिद्धांत देशपांडे 11-13, 11-4, 11-9, 13-15, 11-6; आदित्य दलाल विजयी वि. साहिल मोहिते 11-6, 11-7, 11-9.

महिला एकेरी: सेनहोरा डिसोझा विजयी वि. अंशिता ताम्हणकर 11-9, 15-13, 11-5; मानसी चिपळूणकर विजयी वि. श्वेता पार्टे-नायक 11-6, 11-7, 10-12, 13-15, 11-8.

पुरुष एकेरी: पार्थ मगर विजयी वि. मोहित वैष्णव 11-4, 6-11, 11-7, 11-6; शुभम आंब्रे विजयी वि. मंदार चिपळूणकर 11-4, 9-11, 12-10, 11-9.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *