जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा

 

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २२ ऑक्टोबरला घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये  ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विजय प्राप्त केला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडू यात सहभागी झाले होते.
ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत यामध्ये ४ सुवर्णपदक प्राप्त केले. यामध्ये कोमल तळेले (भगवती विद्यालय), समर्थ गांवकर व आयुष चव्हाण (ब्राह्मण इंग्लिश मिडीयम स्कूल), प्रणव बोऱ्हाडे (ज्ञानसाधना कॉलेज) यांचा समावेश होता. तसेच गोजिरी चोरगे, यश तावडे, कुशल चंदना, भावना बेलोशे (ब्राह्मण इंग्लिश मिडीयम स्कूल) यांनी रौप्यपदक प्राप्त केले. तर आराध्या काशिद (सेंट जॉन द बाप्टिस्ट हायस्कूल), सान्वी पावसकर व अथर्व तटकरे (ब्राह्मण इंग्लिश मिडीयम स्कूल), श्रेयस सावेनकर (भगवती विद्यालय) यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
कठीण परिश्रम, खेळाडूंचा सततचा सराव व ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक केदार जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन यातून यशाचे फळ मिळाल्याचे मुख्य प्रशिक्षक सुनिल काशिद यांनी सांगितले. सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळा तसेच ट्रॅडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक केदार जोशी, मुख्य प्रशिक्षक सुनिल काशिद व सहप्रशिक्षक प्रिन्स व्यास यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *