ठाणे: ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या मातोश्री अनुराधा मुरलीधर मढवी यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्या ८२ वर्षाच्या होत्या. भाजपच्या मा.नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या त्या सासुबाई होत्या. त्यांच्या पश्चात पती मुरलीधर अर्जुन मढवी, मुलगा डॉ. राजेश मढवी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नौपाड्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवर्स येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनाला भाजपचे आ. संजय केळकर,आ. निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, मनसेचे संदीप पाचंगे यांच्यासह राजकिय व सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर,समाजबांधव तसेच, डॉ. राजेश मढवी यांचा मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता. ठाण्याच्या जवाहर बाग मुख्य स्मशानभूमीत गुरुवारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात विधीवत अंत्यसंस्कार पार पडले.