विशेष प्रतिनिधी
मुरबाड: विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या मुरबाडमध्ये दरदिवशी चित्र बदलत आहे. खासदारकीच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळ्या मामांना किसन कथोरेंनी मदत केल्यामुळेच भाजपाचे कपिल पाटील पडल्याचे म्हटले जात होते. कपिल पाटीलांनीही तसा आरोप केला होता. या पार्श्वभुमीवर यंदा शरद पवारांची तुतारी छुप्या पद्धतीने किसन कथोरेंना मदत करतील अशी सुत्रांची माहीती आहे.
यंदाच्या निवडणूकीत किसन कथोरे सलग पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवित आहे. गेल्या निवडणूकीत कथोरे यांनी गोटीराम पवार यांना पराभूत केले होते. यावेळी शरद पवरांच्या राष्ट्रवादीकडून गोटीराम पवार यांच्या एवेजी त्यांचा मुलगा सुभाष गोटीराम पवार यांना उमेदवारी दिली आहे. असे असले तरी स्वता गोटीराम पवार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एनवेळी शरद पवारांच्या दबावामुळे सुभाषने अर्ज मागे घेतला तर यासाठी स्वता गोटीराम यांनीही अर्ज भरला असल्याचे दबक्या आवाजात म्हटले जात आहे.
दरम्यान किसन कथोरे यांच्या उमेदवारी अर्जासाठी स्वता विनोद तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांचे मंत्रीपद हुकले. पण किसन कथोरे यांना मी आता शब्द देतो की तुम्ही लाखोंच्या मताधिक्याने निवडून या. तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळात असाल,’ असे सूचक वक्तव्य भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केले. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना आयोजीत सभेत तावडे बोलत होते. यावेळी किसन कथोरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
मला माझाच विक्रम मोडायचा आहे, यावेळी किमान अडीच लाख मतांच्या फरकाने जिंकायचे टारगेट आहे, असे किसन कथोरे म्हणाले. तसेच आता गटातटाचे उद्योग थांबले. माझा संघर्ष कुणाशी नाही फक्त विकासाशी संघर्ष आहे. असे किसन कथोरे यांनी म्हटले आहे.