ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे ३१ ऑक्टोबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
त्या निमित्ताने श्रीमती इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर, राष्ट्रीय संकल्प दिन आणि राष्ट्रीय एकता दिवस यांच्या निमित्ताने शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.
0000