तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते जलपूजन कार्यक्रम संपन्न
राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात माजी महसुलमंत्री स्व.शांताराम बापू घोलप यांच्या कार्यकाळात झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांमुळे तालुक्यात पिण्यासाठी व पिकांना पाण्याची उपलब्धता झाली, आणि त्यानंतर पुढे शेतकरी हा भाजीपाला पिक घेवुन स्वयंपूर्ण होवु लागला परिणामी मधल्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली. सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी १२ महिने पाण्याची आवश्यकता असताना पाणी योग्य नियोजनामुळे पाणी फक्त १० महिनेच उपलब्ध असते त्यामुळे शेतीतून पुढील दोन महिन्यात नफ्याचे उत्पन्न घेणे अडचणीचे ठरत असल्यामुळेच मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पुढील पाच वर्षात “शेतीसाठी पाणी” हाच अजेंडा चालवण्यात येणार असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. मुरबाड तालुक्यातील पवाळे, पाडाळे, धसई व फांगलोशी लघु पाटबंधारे प्रकल्पांवर जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका कॉंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले व यावेळी किसान कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस जयवंत पवार, तालुका समन्वयक काळुराम विशे, तालुका पदाधिकारी अंकुश धुमाळ, विभागप्रमुख दिपक आलम तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन फनाडे, शिवाजी पवार, धनाजी पवार, अविनाश घोरड, विष्णू मुरबाडे, जनार्दन गोंडाबे आदीं मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, किसानचे तालुका उपाध्यक्ष चिंतामण पष्टे, खोपिवली विभागप्रमुख वसंत कराळे, युवक तालुका उपाध्यक्ष विपुल सुरोशे, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग शिद, भगवान पवार, मुरबाडे आदींनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे पौरोहित्य उदय मंडलिक यांनी केले. जलपूजन हा उपक्रम तालुक्यासाठी नवीन असुन आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मान दिल्याबद्दल कॉंग्रेस कमिटी व चेतनसिंह पवार यांचे आभार यावेळी जनार्दन गोडांबे यांनी मांडले.
