Month: October 2024

ई कचऱ्याविषयी जागरूकता हवी

आज १४ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक ई कचरा दिवस म्हणून साजरा केला जातो. ई कचरा कमी करणे आणि ई कचऱ्याचा पुनर्वापर या बाबत जनजागृती करणे हा या दिवसा…

खऱ्या अर्थाने ‌‘आयुष्मान‌’ करायचे तर…

परामर्ष हेमंत देसाई सरकारने अलिकडेच 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्व वृद्धांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेचा लाभ मिळावा,…

अब तेरा क्या होगा कालिया ?

हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे…

सिद्दीकींना मारणाऱ्यांकडे २८ काडतूस सापडली

मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर  शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. यावेळी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकींचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, सलमान खान आणि अनेक…

मराठी भाषा भवन दर्जेदार व्हावे – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार…

विधानसभा स्वबळावर राज ठाकरेंचा एल्गार

स्वाती घोसाळकर मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारी दिलाय. निवडणूकीत कोणाशीही आघाडी नाही आणि युती करणार नसून येणारी विधानसभा स्वबाळवर लढविणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

शरद पवार नास्तिक आहेत, असं सांगितल्यानंतर ते प्रत्येक मंदिरात जातात- राज ठाकरे

  मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून राज ठाकरेंनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे नेस्कोत आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली. निवडणुकीसाठा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?” “शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?”असा प्रश्नही राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेा विचारला. शरद पवार नास्तिक आहेत “मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.” तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले. ०००००  

एनएमएमटी बसेसमधून  प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, उलवे नोड, खोपोली, कर्जत व वाशिवली / रसायनी या विभागात 40 सर्वसाधारण व 37 वातानुकूलीत अशा एकूण 77 विविध बसमार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून महिलांसाठी उपक्रमाच्या बसेसधून प्रवास करतांना तिकीट दरात 50% सवलत देण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक नमुंमपा यांनी मंजूरी दिलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्यानुसार महिलांना नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः 40% महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित 80,000 महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. तरी महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेले आहे.

शिवसेनेतर्फे नवदुर्गा दर्शन !

  मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे विधानसभा शाखा क्रमांक १२ च्या विद्यमाने प्रथम ती, जागर स्त्री शक्तीचा! योग नवदुर्गा दर्शनाचा अशा अभिनव सहलीचे आयोजन करण्यात आले होते.  या यात्रेचा शुभारंभ  शिवसेना सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते मागाठाणे बोरिवलीत करण्यात आला. या प्रसंगी उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या सौ संजना घाडी,माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, विधानसभा प्रमख अशोक म्हामुणकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे,समन्वयक रोहिणी चोगले, शाखाप्रमुख अशोक परब, अमित मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे यांनी केले. संयोजन शुभदा शिंदे, सारीका झोरे, सचिन मोरे, शुभदा सावंत, योगेश देसाई, माधुरी खानविलकर यांनी केले. 00000

 दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेला बेलापूरच्या किल्यावरून सुरवात.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई : महाराष्ट्र भर दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांना दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरवात होत असते. मुंबई जवळील बेलापूरच्या किल्यावर श्री वाघजाई माता सांस्कृतिक क्रिडा मंडळ,प्रभादेवी आणि शिव भक्तांच्या वतीने शिवप्रतिमा,शस्त्र पूजन व शिव मंदिराला दसरातोरण बांधून या कार्याची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही किल्ल्याची झालेली दुरावस्त पाहता किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान,शिव प्रारंभ प्रतिष्ठान,मावळे आम्ही स्वराज्याचे,या संस्था व रोहित देशमुख, जयवंत निकम,राज मोरे,अमोल कदम,अजित कारके, किरण भोसले,कुलदीप धुमाळ,सुरज कदम आणि मोठया संख्येने शिव प्रेमी मावळे उपस्थित होते. ००००००००००००००