सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा मुंबई : सेनहोरा डिसूझा आणि शुभम आंब्रेने सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. पार्थ मगर हा १७ आणि १९ वर्षांखालील गटात अजिंक्य राहिला. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेनहोराने मानसी चिपळूणकरवर सरळ गेममध्ये १३-११, ११-६, ११-८ अशी मात केली. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये शुभम आंब्रेने पार्थ मगरचे आव्हान पिछाडीवरून ५-११, ११-२, ११-७, ११-५ असे मोडीत काढले. पार्थ मगरने १७ आणि १९ वर्षांखालील मुले गटामध्ये बाजी मारली. दोन्ही गटात आदित्य दलाल हाच त्याचा प्रतिस्पर्धी होता. १७ वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत पहिला गेम हरूनही 9-11, 11-7, 12-10, 13-11 असा विजय मिळवला. १९ वर्षांखालील गटात पार्थला ११-७, ११-४, ११-७ असे सहज पराभूत केले. १७ आणि १९ वर्षांखालील मुली गटामध्ये मुग्धा देसाई आणि अंशिता ताम्हणकर आमनेसामने होत्या. त्यात १७ वर्षांखालील मुली गटात मुग्धाने अंशिता ताम्हणकरवर पिछाडीवरून 9-11, 11-8, 11-7, 11-6 अशी मात केली. १९ वर्षांखालील मुली गटामध्ये अंशिता ताम्हणकरने मुग्धा देसाईला चुरशीच्या लढतीत 11-6, 9-11, 10-12, 12-10, 11-8 असे हरवत पराभवाचा बदला घेतला. निकाल: (अंतिम फेरी) – १७ वर्षांखालील मुली: मुग्धा देसाई विजयी वि. अंशिता ताम्हणकर 9-11, 11-8, 11-7, 11-6; मुले: पार्थ मगर विजयी वि. आदित्य दलाल 9-11, 11-7, 12-10, 13-11. १९ वर्षांखालील मुली: अंशिता ताम्हणकर विजयी वि. मुग्धा देसाई 11-6, 9-11, 10-12, 12-10, 11-8. मुले: पार्थ मगर विजयी वि. आदित्य दलाल ११-७, ११-४, ११-७.…