Month: October 2024

जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धा

श्री मावळी मंडळ यांस तिहेरी मुकुट   ठाणे  : दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित  शतक वर्ष निमित्त जिल्हास्तरीय आंतर शालेय स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूल च्या खो खो संघाने तिहेरी मुकुट संपादन केले आहे. शतक वर्षामध्ये संघाने घवघवीत यश मिळवले म्हणजे त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर कळवा विरुद्ध हा सामना १ डाव ३ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये कु आयुष सोनवणे ह्याने 3 मिनिटे संरक्षण केले.  स्वरां जाधव ह्याने १ मिनिटे संरक्षण केले, सोहम ठाकूर ह्याने नाबाद 1 मिनिटे संरक्षण कारून संघास विजयी करण्यात योगदान दिले. तसेच १७ वर्षाखालील मुलिंच्या संघाने अंतिम समन्यामध्ये न्यु कळवा  हायस्कुल विरुद्ध हा सामना १ डाव २ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदम ह्यांनी अष्टपैलू खेळी करून संघास विजयी केले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर विरुद्ध हा सामना १ डाव ५ गुण राखून एकतर्फी विजेतेपद मिळवले. स्पर्धे मध्ये ह्या संघाने सर्व सामने एकतर्फी विजयी होऊन स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. अंतिम समन्यामध्ये  अभिराज वाळंज ह्याने नाबाद 2 मिनिटे संरक्षण करून समन्यामध्ये 3 गडी  बाद करून अष्टपैलू खेळी केली, पार्थ मायनांक ह्याने 2 मिनिटे संरक्षण केले तर भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून दिला. राज्यस्तरीय प्रशिक्षक  प्रणय कमले हे त्यांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्री मावळी मंडळ संघाने बरेच विजय संपादन केले आहे. 0000

ठाणे जिल्हा नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

ठाणे  : उत्तेजक द्रव्ये आणि नको असलेल्या प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची वाढत्या वयात जाणीव करून देण्यासाठी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेतर्फे पाचव्या ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन…

मुंबई पोलीस विशेष गटाच्या बाद फेरीत, तर शिवमुद्रा प्रतिष्ठान कुमार गटाच्या उपांत्य फेरीत

मुंबई : मुंबई पोलीस, रिझर्व्ह बँक, मुंबई कस्टम, हिंदुजा रुग्णालय यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गटाची बाद फेरी गाठली. नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी कुमार गटाच्या उपांत्य…

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता    

मुंबई : सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतर शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक…

 पर्यावरणपूरक मूर्तींसाठी आतापासूनच तयारीला लागा

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश   ठाणे : पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक मूर्तींसाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आतापासूनच तयारीला लागावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्थेप्रमाणेचे सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यंदा ठाणे महापालिकेने भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आणखी काटेकोर नियोजन करून त्यांची संख्या वाढवावी. त्याबद्दल जनजागृती करावी. आपल्या सोसायटीच्या दारातच मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याची सोय उपलब्ध झाली तर नागरिक त्याचा निश्चितपणे स्वीकार करतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. सोमवारी, माजिवड्याच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त राव यांनी यंदाच्या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या बैठकीत सादरीकरण केले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची संवेदनशीलता मूर्तीकार, भाविक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संघटना, मूर्तीकारांची संघटना यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे महापालिकेने आयोजन करावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी केली. यंदाच्या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारा अहवाल सादर करण्यात यावा. त्यात, शाडू माती, पिओपी यांच्या मूर्तींचा संख्या किती होती, याचे विवरण असावे. त्या संख्येचा अभ्यास करून पर्यावरणपूरक मूर्तींच्या जागृतीसाठी धोरणाची आखणी करता येईल. त्याचबरोबर, टाकी विसर्जन व्यवस्थेसह पुढील वर्षी फिरत्या विसर्जन व्यवस्थांमध्ये वाढ करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. येत्या काळात दसऱ्याला देवींच्या मूर्तीचे विसर्जन होईल. तसेच, छट पूजेसाठीही दोन-तीन दिवस रायलादेवी, कोलशेत, मासुंदा येथे भाविक येतील त्यांचीही चांगली व्यवस्था केली जावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

 ठाणे जिल्ह्यातील ३ संस्थांचे नामकरण

 मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख ठाणे : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.” नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे, १. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे- धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे २. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे ३. शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, (महिला) ठाणे, जि. ठाणे- राजमाता जिजाऊ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) ठाणे, जि. ठाणे

अतिक्रमण विभागाने तुर्भे विभागात केली तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली…

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विचुंबे पुलाचे लोकार्पण

पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत…

हरियाणा व महाराष्ट्राची परीस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल – रमेश चेन्नीथला

मुंबई : हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून…

सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाचा असतो-नारायण राणे

कुडाळ :’सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असते ‘ अशा शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा गौरव केला. देसाई यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नुकतीच मुंबईत निवड झाली.यानिमित्ताने कुडाळ शहर वासियांतर्फे त्यांचा नागर सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राणे म्हणाले, संग्राम देसाई यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे.लोकांना  न्याय मिळवून देण्यासाठी ते कशाप्रकारे लढतात हे मी पाहिले आहे. राणे यांच्या हस्ते यावेळी देसाई यांचा  मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत जायभावे, ॲड गजानन चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे ॲड विवेक घाडगे, सत्कार समिती अध्यक्ष अमित सामंत, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई तसेच जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर, काका कुडाळकर, अभय शिरसाट, धीरज परब, संतोष शिरसाट, गजानन कांदळगावकर, विजय प्रभू ,ॲड, अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, ॲड.आनंद गवंडे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, मी जिल्ह्यात आलो तेव्हा माझी पहिली ओळख संग्राम यांचे वडील ॲड. डी . डी.देसाई यांच्याशी झाली त्यानंतर ॲड.संग्राम यांची ओळख झाली.एक सर्वसामान्य वकील ते आता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदा पर्यंतची त्यांची वाटचाल ही जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आणि भूषणावह आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरक,माजी खासदार निलेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संग्राम देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड उमेश सावंत, सुत्रसंचलन सुमेधा नाईक, अविनाश वालावलकर यांनी केले.