Month: October 2024

मुंबईतील कौशल्य केंद्र एक लाख तरुणांना देणार प्रशिक्षण  – पियूष गोयल

मुंबई – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी आज कांदिवली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली. शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने…

 ‘हक्क मिळवायचे असतील तर जात-धर्माच्या चक्रात अडकू नका’

 ह.भ.प. शामसुंदर महाराज. सोन्नर यांचे शेतकऱ्यांना आवाहन राजेंद्र साळसकर तेलगाव : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षांत अडकवले जात आहे. त्यांच्या धार्मिक अस्मिता टोकदार केल्या जात आहे. आपले हक्क मिळवायचे असतील तर  शेतकऱ्यांनी जात धर्म विसरून एक व्हावे, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्य़ातील तेलगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी शामसुंदर महाराज यांनी कीर्तनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, ज्याची कुणी मागणी केली नाही अशा योजनांवर सरकार कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जाहीर केलेले अनुदान,  पीक विम्याचे पैसे  शेतकऱ्यांना मागूनही वेळेवर मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही. खरं तर शेतीवर उपजिविका करणारा मोठा वर्ग देशात आहे. मात्र तो एकत्र येऊ नये म्हणून त्यांत फूट पाडली जात आहे. धर्माच्या अस्मिता टोकदार करून धार्मिक विद्वेष वाढविला जात आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांची जाणीव होत नाही. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावे. जात धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून एक व्हावे, तरच आपल्याला न्याय्य मिळेल, असेही शामसुंदर महाराज म्हणाले. किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष काॅ. अजय बुरांडे यांनी या धरणे आंदोलनामागील भुमिका स्पष्ट केली. आम्ही नवीन काही मागत नाहीत, सरकारनेच जे जाहीर केलं आहे ते वेळेत द्यावे याठी हे आंदोलन असल्याचे सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड भगवान बडे श्री. विठ्ठल दादा लगड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी न्यायाधीश  बाबुराव तिडके, कॉ. सुभाष डाके, विष्णू देशमुख, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. सय्यद रजक आदी उपस्थित होते. कागदावरच पीठलं-भाकरीचा महाप्रसाद किसान सभेच्या आंदोलकांनी कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरातून आणलेले पिठल भाकरी काढल्या. वर्तमान पत्राच्या कागदावर वाढून घ्यायला सुरुवात केली. शामसुंदर महाराज यांची जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. मात्र तिकडे न जाता शामसुंदर महाराज यांनी सर्व आंदोलकांसोबत कागदावरच पीठल-भाकर वाढण्यास सांगितले. कार्यकर्ते घरी जेवणाची चांगली व्यवस्था केली असल्याचे सांगत होते. मात्र गोपाल कृष्णाने अशाच सर्व गोपाळांच्या शिदो-या एकत्र करून काला केला होता. आज तुमच्या सर्वांच्या घरातून आलेल्या या भाकरी त्या गोपाल कृष्णाच्या काल्याच्या प्रसादासारख्या आहेत, असे सांगून पीठल-भाकरीच्या महाप्रसादाचा आनंद वर्तमान पत्राच्या कागदावरच महाराजांनी घेतला.

कल्याणच्या पेशवेकालीन श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती

कल्याण : प्राचीन मंदिरांपैकी एक आणि पेशवेकालीन मंदिर अशी ओळख असलेल्या टिळक चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचा पाचवा दिवस काहीसा खास ठरला. आजच्या ललित पंचमीचे औचित्य साधून कल्याणातील सकल हिंदू…

भिवंडीत नवरात्रोत्सव आणि गरबा उत्सवाला गर्दी

भिवंडी : शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील सर्व हिंदूबहुल भागात दुर्गामातेच्या भव्य मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तेथे मोठ्या संख्येने महिला गरबा खेळत दुर्गामाता व अंबेमातेसाठी…

न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक…

कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना साकडे घालून या कामगारांना पुन्हा नोकरी मिळवून दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले असून, या कामगारांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या सहा ते सात वर्षांपासून १४८ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलकुंभ, व्हॉल्व्ह आणि बिलांचे वाटप आदी कामे त्यांच्याकडे सोपविलेली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने अचानक सर्वांना काढून टाकले. त्यातील काही जणांनी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांना साकडे घातले होते. त्यानंतर भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रश्नांवर सुरुवातीपासून आयुक्त राव यांची भूमिका सहानुभूतीची होती. अखेर आज आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधित कंत्राटदाराने सर्व १४८ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास मान्यता दिली. सर्व कामगार आज पुन्हा कामावर रुजू झाले. या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी सांगितले. पुन्हा नोकरी मिळाल्याचा आनंद तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या निर्णयानंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. तसेच आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक भरत चव्हाण, युवा मोर्चाचे सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले. यापुढील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कंत्राटी कामगारांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही भरत चव्हाण यांनी दिली. 00000

डॉ.महेश अग्रवाल यांची राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या सहाय्यक मंत्रीपदी नियुक्ती

ठाणे : राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा ही महात्मा गांधींनी 1936 मध्ये स्थापन केलेली अखिल भारतीय संस्था, गेली 88 वर्षे देशभरातील राज्यांमध्ये आणि परदेशातही हिंदी मासिके, पुस्तके प्रकाशित करत आहे आणि…

संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा हरियाणातील विजय साजरा

ठाणे : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केल्यावर ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ठाणे शहरात विजयी जल्लोष केला. भाजपाच्या वर्तकनगर येथील कार्यालयाबाहेर फटाके फोडून…

दुबार मतदार न  वगळल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार –  आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पार पडणा-या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक पूर्व सर्वे केले असता त्या दरम्यान मतदार यादीमधील अनेक चुका आढळून आल्या आहेत. आम्ही केलेल्या सर्वेनुसार या मतदार संघामध्ये असलेल्या यादी क्र. १ ते ३९२ बूथ (एकूण मतदार ४,४३,३३१) मध्ये जवळ-जवळ ३१,२३४ दुबार मतदारांची नावे आम्हांला आढळून आली असल्याबाबत त्या नावांवर आम्हांला हरकत असून ती दुबार नावे तात्काळ वगळण्यात यावीत अशा आशयाचे पत्र आम्ही १८ जुलै,  मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांना दिले. त्यानंतर ६ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये आम्हांला ३०,८१२ दुबार नावे आढळली त्यानंतर हरकती नोंदविण्याच्या कालावधीमध्ये आम्ही ९ ऑगस्ट, २०२४ रोजी पुन्हा मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्राद्वारे या याद्यांमध्ये आढळलेली ३०,८१२ दुबार नावे वगळण्याबाबची विनंती केली. अंतिम मतदार यादी दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर देखील आम्ही पुन्हा सर्वे केला असता; आजही त्या मतदार याद्यांमध्ये यादी क्र. १ ते ४०९ (एकूण मतदार ४,६८,२५२) मध्ये २४,२२६ दुबार मतदार आहेत. आम्ही मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, आम्ही १८ जुलै, २०२४ व ९ ऑगस्ट, २०२४ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ५,८८४ दुबार नावे वगळण्यात आल्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला असल्याची तोंडी माहिती त्यांनी दिली. तसेच २७ सप्टेंबर, २०२४ रोजी मा. मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांना पत्राद्वारे यादी क्र. ३७७ ते ४०९ या याद्यांमध्ये १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदार देखिल नोंदविण्यात आल्याची लेखी तक्रार आम्ही केली आहे. तसेच ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी यादी क्र. ३७७ ते ४०९ मधील याद्यांवर निवडणूक विभागाचे BLO यांच्याबरोबर राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेमलेले BLA यांनी या याद्यांचा सर्वे करुन मतदारांची तपासणी करावी अशा प्रकारचे देखिल पत्र दिले आहे, त्याबाबतही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी आजही यादी क्र. १ ते ४०९ मध्ये असलेली २४,४२६ दुबार नावे वगळण्याबाबत उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे.१४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचरी काम करीत आहेत, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बोलताना दिली आहे. चौकट डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.ज्या माणसावर किडनॅपिंग चा गुन्हा आहे, ज्या माणसावर स्री शक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे.मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को व खोटी पिटाची केस करण्याचा षड्यंत्र रचण्याचा आरोप आहे. यांनी तरी दुसऱ्याला नावे ठेऊ नयेत.आम्हीही त्यांना कुठल्या ना कुठल्या नावाने बोलु शकतो पण माझ्यावर ते संस्कार नाहीत. नवरात्रीचा मंगलमय पर्व चालू आहेत. करोडो हिंदूंचे आस्था असलेले प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य ते करु शकतात, विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जे फाडू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचे ? ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात, भाषा,मर्यादा सोडून बोलणे हा त्यांचा गुण आहे.पण जनाची नाही पण मनाची लाज त्यांनी दुसऱ्याला नावे ठेवताना त्यांनी दाखवायला हवी, अशी अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हवी असे मला वाटत नाही, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले. ००००