Month: October 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी आंदोलनाचा इशारा

राजेंद्र साळसकर मुंबई : शिवाजी नगर गोवंडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या विरोधात ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश राजाराम गुंडेट्टी व श्रीहरी महेश गुंडेट्टी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या,  ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आपला तेजोमय आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू विद्यालयात काही समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी  केला आहे. या कथित समाजकंटकांनी भायखळा येथील रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले.त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली.निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले.त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले. याबाबत आम्ही शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही.अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार – बबनराव मदने

रमेश औताडे मुंबई : धनगर व धनगड या शब्दातील ‘ड’ या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. धनगर एस टीआरक्षण अंमलबजावणी, आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधीनां संधी मिळावी. १९५६ च्या एस टी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग धनगर   याऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. धनगर समाज कोणाच्या ताटातले आरक्षण मागत नाही जे घटनेत आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे बबनराव मदने म्हणाले. यावेळी पक्षाच्या स्वामिनिताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, श्रीकांत मयेकर, भूषण नागवेकर, समर्थ भाईंदरकर, ललन पाल, सुरेश बोहोत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुरबाडमध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार— शैलेश वडनेरे

राजीव चंदने मुरबाड : ‘मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, पाणी,आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि मी आमदार झालो तर मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार’, असे प्रतिपादन शैलेश वडनेरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केले आहे, मुरबाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भिमाईचे जन्म स्थान आहे. आज पर्यंत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील आंबेटेबें येथील भिमाई भुमीला भेट दिली नसून भीमअनुयायीनां उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे,असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) उमेदवार शैलेश वडनेरे यांनी उपस्थित पत्रकारांना चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर सर्वप्रथम भिमाई भुमीचा विकासाचा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही,तसेच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्रा मधील अनेक वाडया पाड्यात रस्ते झाले नाही,विज पुरवठा मध्ये चाललेला सावळा गोधळ,पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक रखडले  विकास काम पहिल्यांदा करणार असे दै, बित्तंबातमीशी बोलताना सांगितले.

पेजर वॉरच्या निमित्ताने…

खास बात दीपक शिकारपूर अलिकडे गोंधळ माजवणाऱ्या, जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोठी हानी पोहोचवणाऱ्या ‌‘पेजर बॉम्ब‌’च्या निमित्ताने युद्धाचे वेगळे आणि हायटेक स्वरुप समोर आले. या माध्यमातून लेबनॉनमध्ये अनेक पेजरमध्ये स्फोट…

हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला रामराम करीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची…

आरक्षणाची मर्यादा वाढवून ७५ टक्के करा- शरद पवार

सांगली : आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन वाढवून ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा २५ टक्क्यांमध्ये समावेश करता येईल. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली…

‘आदिवासींचा’ एल्गार

उपसभापती झिरवाळांसह सत्ताधारी आदिवासी आमदारांनी न्यायासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी सरंक्षक झाळीमुळे बचावले. झिरवाळांना अश्रु अनावर स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आणि त्यातही मंत्रालयात आज आदिवासी आमदारांनी आपल्या न्याय…