Month: October 2024

मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  पोईसर जिमखाना, कांदिवली पश्चिम येथे पार पडली. या सभेमध्ये मुंबई उपनगरच्या १०० पेक्षा जास्त सभासदांचा  सहभाग होता. या सभेत मल्लखांब खेळाच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी मल्लखांब खेळचे महत्व वाढवण्यावर विचारविनिमय केला आणि योग्य निर्णय घेतले. मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त  गणेश देवरुखकर , २री विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजयी खेळाडू जान्हवी जाधव , अक्षय तरळ, उपविजेती रुपाली गंगावणे यांना सन्मानीत करण्यात आले. यावर्षीपासून, उपनगर संघटनेने कै. दत्ताराम दुदम (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या स्मरणार्थ १४ वर्षांच्या वयोगटातील एक मुलगा (विराज आंब्रे.) व एक मुलगी (तन्वी दवणे.) यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यास  सुरुवात केली. या पुरस्कारासोबतच रोख ५,०००/- रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ ॲड. प्रतिभाताई गिरकर (मा.नगरसेविका) यांच्या हस्ते करण्यात आले.…

प्राध्यापक प्रकाश सुर्वे चमकले

 शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर राज्यपातळीवर मिळवला तिसरा क्रमांक   ठाणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. प्रकाश राजाराम सुर्वे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे .सेंट जॉन दि  बाप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक प्रा.सुर्वे प्रकाश राजाराम यांना हा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .रोख ३० हजार रुपये ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.यावेळी  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती.नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व देण्यात आले आहे.शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत होईल.  तंत्रस्नेही शिक्षकांमुळे भविष्यात दर्जेदार आणि गुणवंत विद्यार्थी घडतील ,असा आशावाद शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर ,आयटी विभागाचे सोनावणे , मुळये आदि मान्यवर उपस्थित होते .यावेळी विविध गटातील विजेत्या ८४शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रोख ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार रुपये तर तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक ,डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्य शिक्षण सचिव कुंदन यांनी व्यक्त करून उपस्थित पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे कौतुक केले. 00000

 बांबू शेती ठरणार कल्पवृक्ष – पाशा पटेल

 पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रमेश औताडे   मुंबई : ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून बांबू आता कल्पवृक्ष ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही बांबू शेती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्यातील गृहनिर्माण उपक्रमासाठी ग्रीन महाराष्ट्र साठी नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको), महाराष्ट्रा तर्फे भारतातील सर्वांत मोठ्या रियल इस्टेट प्रॉपर्टी एक्स्पो ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत जिओ बर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी  बांद्रा येथे करण्यात येत असून या मध्ये बांबू हरीत गृह प्रदर्शन होत असून हरित घरे कशी असतील हे जनतेला माहिती होईल.असे नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष  प्रशांत शर्मा यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर करण्यात येणार आहे. नरेडको ने फिनिक्स फाऊन्डेशन संस्था या प्रसिध्द कृषीतज्ञ आणि पर्यावरणाशी सुसंगत पीक म्हणून बांबूचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणारे  पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील संस्थे बरोबर भागीदारी केली आहे. असे नरेडको चे उपाध्यक्ष  राजन बांदेलकर यांनी सांगितले. वातावरण बदलाशी मुकाबला करत असतांना रिअल इस्टेट क्षेत्र हे मोठे योगदान देत असते, कारण ते बांबू सारख्या वस्तूंचा उपयोग हा बांधकाम प्रकल्पांमध्ये परंपरागत गोष्टींच्या ऐवजी करु शकतात ज्यामुळे वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊन तापमानाच्या समस्येवर उपाय केला जाऊ शकेल असे नरेडको सचिव राजेश दोशी यांनी सांगितले. 00000

नवी मुंबईच्या भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महानगरपालिकेचे गतीमान नियोजन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा…

नवीन पनवेलमध्ये नवरात्रौत्सव

पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. नवीन पनवेल मधील सीकेटी विद्यालयाच्या…

 मिठागरांच्या जमिनी देऊन मोदानी अँड कंपनीचा आणखी एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा.

 मिठागराची फक्त २५६ एकर जमीन नाही तर सर्व मिठागरे बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा डाव – वर्षा गायकवाड. मुंबई : धारावीकरांचा, मुंबईकरांचा आणि पर्यावरणवाद्यांचा प्रखर विरोध असतानाही भाजपा-शिंदे सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून अदानीच्या फायद्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अदानीला फक्त २५६ एकर मिठागराची जमीन दिलेली नाही तर मुंबईतील सर्व मिठागर जमिनी बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा डाव असून यातून मोदानी अँड कंपनीचा आणखी एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे असा घणाघाती हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कांजूरमार्ग, मुलुंड व भांडूप येथील मिठागराची जमीन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सडकून टीका केली, त्या पुढे म्हणाल्या की, शिंदे सरकार अदानीचे एजंट बनून काम करत आहे, त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे. मुंबईकरांचे हक्क मारायचे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे आणि मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायच्या, हा या सरकारचा अजेंडा आहे. मुंबईकरांचा विरोध असताना टेंडरमध्ये सोयीस्करपणे बदल करून अदानीला धारावीची जागा दिली आणि नंतर धारावी पुनर्विकासाच्या आडून मुंबईतील जवळपास १५०० एकर जागा अदानींच्या घशात घातली आहे. सरकार पात्र अपात्र असा भेदभाव करत असेल पण धारावीकरांना पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावी कराने ही धारावी आपल्या रक्त आणि घामाने उभी केली आहे, त्यामुळे पात्र-अपात्रचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे मिळाली पाहिजेत. मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी दिल्या जात आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव घेऊन हे केवळ भखंड बळकावण्याचे कारस्थान आहे. हा विकास नाही तर  मुंबईकरांची लूट असून आम्ही ही लूट थांबवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहू असा निर्धार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठागरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मिठागरे पावसाळ्यात कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवतात. मुंबईकरांना पुराचा फटका बसण्यापासून वाचवतात. मिठागरांच्या जमिनीवर भराव घालून तिथे इमारती उभारल्या तर मुंबई शहराला भयंकर पुराचा धोका संभवतो. पर्यावरण दृष्ट्या, खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे भयंकर परिणाम होतील. असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. 0000

 राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनाचा दणका

 ठामपाकडून लवकरच पाणी अन् कचरा समस्येचा निपटारा होणार   ठाणे : मुंब्रा – कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात डॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी ठाणे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिले. मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे. मागणी करूनही पाणीपुरवठा वाढविण्यात येत नाही. तसेच, कचरादेखील उचलण्यात येत नाही. या निषेधार्थ ठामपाच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, हिरा पाटील, फरजाना शेख, रेहान पितलवाला, साकीब दाते, मैशर शेख, नाजीम बुबेरे,  शोएब खान,  शाकिर शेख, जाहीद राजपूत  कमरून हुदा  यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरूष आणि लहान मुले सहभागी झाले होते.  याप्रसंगी,  पठाण यांनी, गेल्या 15 दिवसांपासून 3-3 दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचले जात आहे. टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करीत आहेत. विकण्यासाठी पाणी आहे. मात्र, गोरगरीबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहेत.   शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही. अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील शाळेजवळील  कचराही उचलण्यात येत नाही, असा आरोप करीत पाणी माफियांवर मोक्का लावण्याची मागणी केली होती. या आंदोलनात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढल्यानंतर आज (मंगळवारी) ठाणे पालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळ गाठले. ठाणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विनोद पवार , मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड,  मुंब्रा पाणीपुरवठा विभागाचे साळुंखे , घनकचरा विभागाचे एकनाथ मोतीलाल  यांनी शानू पठाण आणि आंदोलकांची भेट घेऊन पाणी, कचरा यासर्व सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळेस विनोद पवार यांनी, पाणी चोरी रोखण्यासाठी मोहीम आखण्यात येईल; तसेच,  वाॅलमेन्स वाढविण्यात येणार आहेत. शिवाय, पाणीचोरांवरही कडक कारवाई करण्यात येईल,  असे जाहीर केले. तर बाळू पिचड यांनी कचर्याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. मात्र, ठाणे पालिकेने मुंब्रा – कौसाबाबत अशीच सापत्न भावाची दृष्टी ठेवली तर अत्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा शानू पठाण यांनी दिला. चौकट मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा एकीकडे पाणी आणि कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंदोलक धरणे आंदोलन करीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण या शेकडो महिलांसह आंदोलनात सहभागी झाल्या. कौसा, अमृतनगर, रशीद कपाऊंड आदी भागातील महिला मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने येऊन आंदोलनात सहभागी झाल्या. 00000

ठाणे महानगरपालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा ४२वा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप…

वसई-विरारला क्षयरोगाचा विळखा

वसई : वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात क्षयरोगमुक्तीसाठी प्रशासनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण ६९२ रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे महापालिका…

घोडबंदरमध्ये अद्ययावत कॅशलेस रुग्णालय

१५० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल; गरजूंना मिळणार मोफत शस्त्रक्रियेसह उपचार   ठाणे : महापालिका क्षेत्रात आणखी एक कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील नळपाडा येथे १५० खाटांचे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे बांधकाम पालिकेने केले आहे. हे रुग्णालय एका सेवाभावी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे; मात्र महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत येथे रुग्णसेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांवर महागड्या शस्त्रक्रियेसोबतच उपचारही मोफत मिळणार आहेत. या रुग्णालयाचा उपयोग लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. आचारसंहिता लागण्याआधी त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे, तसेच सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे २५ कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे, अशा संस्थेला हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले आहे. सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सांभाळणार आहे. ज्या शस्त्रक्रियेसाठी बाहेर लाखो रुपये लागतात, अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होणार आहेत. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूंना सेवा देणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने रुग्णाच्या साध्या तपासणीपासून डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. राज्यातील तिसरे कॅशलेस रुग्णालय ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. चाचण्यांपासून शस्त्रक्रियेपर्यंत सुविधा कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसवणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्ततपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, २डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग  सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपचार उपलब्ध होणार आहेत. ००००