Month: October 2024

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच ठाण्यातील बंड शमले

  ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. दादाचं काम बोलतय असे पोस्टर शहरभर झळकवून त्यांनी या मतदारसंघावर दावाही ठोकला होता. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला गेली. या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने येथे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे भोईर हे नाराज झाले होते. त्याचबरोबर शिंदे सेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करत बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. हे दोघे अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते. यामुळे ठाणे शहर मतदारसंघात बंड अटळ मानले जात होते. या बंडामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाणे शहरात बंडाची भाषा होऊ लागताच मतदारसंघाशेजारीच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ देण्याची मागणी करत भाजपनेही दबावतंत्राचा अवलंब केला होता. असे असतानाच, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजप इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले नाहीत. तर, अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. कोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्यांचा शब्द अंतिम मानून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. – संजय भोईर, माजी नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) ०००००

भाजपा युवा व महिला मोर्चाने शिकविला सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला धडा!

ठाण्यातील ८ विद्यार्थीनींचे पैसे मिळवून दिले परत ठाणे : जनरल नर्सिंग कोर्स देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मुलींची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला भाजपा महिला मोर्चाने धडा शिकविला आहे. फसवणूक झालेल्या ८ मुलींची १ लाख ६२ हजारांची रक्कम संस्थेने परत दिली आहे. या संस्थेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक व नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी केली आहे. सामान्य घरातील तरुण मुलींना लवकर रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून राममारुती रोडवरील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटने मुलींना प्रवेश दिले होते. प्रवेश घेताना महाराष्ट्रातील विद्यापीठाची अभ्यासक्रमाला मान्यता असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून एका वित्तीय संस्थेकडून मुलींच्या कागदपत्रांची शहानिशा न करताच कर्ज मंजूर करुन संस्थेला दिले गेले. त्यानंतर या मुलींचे परराज्यातील बनावट विद्यापीठात प्रवेश करण्यात आल्यावर या प्रकाराला ८ मुलींनी आक्षेप घेतला. त्यांनी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस प्रशांत कळंबटे,गुलाब झा, कीर्ती शेट्टी, प्रसाद विश्वकर्मा,हिमांशू राजपूत यांनी इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर आठ मुलींनी प्रवेशावेळी जमा केलेली रक्कम १ लाख ६२ हजारांची रक्कम परत करण्यात आली. या इन्स्टिट्यूटवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने केली आहे. त्याचबरोबर अशा फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची सातत्याने तपासणी करुन कारवाईचा आग्रह धरला आहे.

महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे  नुकतेच ताडदेव येथील जनता केंद्रामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महापालिकेचे निवृत्त सह आयुक्त सुनील धामणे, बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सर्वश्री डॉक्टर मारुती नलावडे, कार्यवाह, महादेव सोहनी, उपाध्यक्ष प्रतिमा पवार, संयुक्त कार्यवाह, शिवराम अधिकारी, संयुक्त कार्यवाह हे उपस्थित होते. दीप पूजन झाल्यानंतर रवी मोरे, श्रीमती अनुजा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त कर्मचा-यांनी कराओकेवर गाणी सादर केली. या कार्यक्रमात अपर्णा शेट्ये यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले. त्यानंतर डॉ. गंगावणे यांच्याकडून कविता लेखनाचे विविध प्रकार उलगडून सोदाहरण सांगण्यात आले. डॉ. मारुती नलावडे यांनी कविता सादर केली. अशा नानाविध कार्यक्रमांनी हे स्नेहसंमेलन संपन्न झाले. वामन कुरतडकर यांनी या कार्यक्रमाकरिता सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच या कार्यक्रमाकरिता नामदेव थोरात, सुधीर शिशुपाल, शशिकांत गंगावणे. नवनाथ पाटील, प्रकाश नार्वेकर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. सेवानिवृत्तांच्या अपेक्षा उंचावून हा कार्यक्रम संपन्न झाला.

मुलुंडचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयास जोगेंद्र कवाडे यांची भेट

  भीमशक्तीचा मिहीर कोटेचा यांना पूर्ण पाठिंबा असल्याची जोगेंद्र कवाडे यांनी दिली ग्वाही मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी मुलुंड विधानसभेचे भाजप, शिवसेना,…

असह्य महागाई

रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणापलीकडे महागाई गेली आहे. सरकारला तर त्याबाबत संवेदनशीलताच नाही. अर्थमंत्री महागाईबाबत जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान करतात. लोकसभेच्या निवडणुकीत महागाईच्या मुद्द्याची चर्चाच होऊ द्यायची नाही, अशी केलेली व्यूहनीती…

निवडणूक काळात सोशल मीडियावर करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर…

डॉ. होमी जहांगीर भाभा

भारताच्या आण्विक शक्तीचे जनक असे ज्यांना म्हटले जाते त्या डॉ होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन. स्वतंत्र भारताला समर्थ आणि बलवान बनवण्यासाठी ज्या महान व्यक्तींनी जीवाचे रान केले त्यात डॉ…

राज्यातील सर्वात मोठी  दिवाळी अंक स्पर्धा जाहीर

प्रथम पारितोषिक १ लाख रुपये,  रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 24 वी…

‘बीएसएनएल‌’च्या ग्राहकसंख्येत साठ लाखांनी वाढ

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्सच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली. सर्वच कंपन्यांचे कॉलिंग, डेटा प्लॅन महागले. त्यानंतर देशात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची एकच लाट आली आणि ग्राहकांनी ‌‘बीएसएनएल‌’कडे मोर्चा वळवला. परिणामी, ‌‘बीएसएनएल‌’च्या…