Month: November 2024

समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

हरिभाऊ लाखे नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.

सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात रंगणार अंतिम सामना

आंतरशालेय खो-खो स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धा सुरु आहेत. पहिला उपांत्य सामना सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा १८-१० असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सरस्वतीच्या खेळाडू रिया सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत नाबाद १:४० मिनिटे खेळून ७ गुण मिळवले, तर राधिका कोंडुसकरने १:५० मिनिटे खेळत ३ गुणांची भर घातली. वैदवी बटावलेनेही प्रभावी खेळ करत नाबाद ३:१० मिनिटे खेळले आणि १ गुण मिळवला. दुसऱ्या बाजूला, अहिल्या विद्या मंदिरच्या अर्णवी शेंगाळेने आक्रमणात ६ गुण मिळवत एकहाती लढत दिली, मात्र तिला संघाकडून पुरेशी साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. दुसरा उपांत्य सामना बंगाली एज्युकेशन सोसायटीने वाडीबंदर एमपीएस स्कूलवर १५-०४ असा एक डाव आणि ११ गुणांनी विजय मिळवला. बंगाली संघाकडून कार्तिकी कानसेने ५:३० मिनिटे खेळत ३ गुण मिळवले, सिद्धी शिंदेने ५:३० मिनिटांत ४ गुणांची कमाई केली, तर अनघा पन्हाळेने १:२० मिनिटे खेळत २ गुण मिळवले. त्यांच्या प्रभावी खेळामुळे संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वाडीबंदर एमपीएस स्कूलकडून निधी शिगवण आणि अंकिता वाकोडे यांनी प्रत्येकी १ गुण मिळवला, परंतु संघाची एकत्रित कामगिरी अपयशी ठरली. आता अंतिम फेरीत सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात चुरस पाहायला मिळेल. ००००

कामगार महर्षी आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० डिसेंबरला

मुंबई : कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर…

मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे  – रामदास फुटाणे

मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व…

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा                                      

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खडकपाडा , वायले नगर, कल्याण पश्चिम येथील वरटेक्स सॉलिटेअर ए.१ या इमारतीला आग लागल्याची वर्दी श्री अविनाश या इसमाने भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२४०९२६० द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर…

 गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

मुरबाड शहरी व ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु मुरबाड : (राजीव चंदने ) संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असली तरी तो बिनधास्तपणे दुध डेयरी, पानटपरी व वडापाव गाडीवर चोरून विकला जात आहे. शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटका थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेस पडत असतात. मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यातील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनदास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा उघड चर्चा आहे. मात्र असे असतांना गेल्या पाच ते सहा वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एक ही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करीत आहेत, अनेक वृत्तपत्रात गुटखा माफिया बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही? असा सवाल मुरबाड शहरातील शिवसेना पक्षाचे (उ. बा. ठा.) कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केला आहे. शहर व ग्रामीण भागातील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या परंतु या गुटखा माफियाना पोलिसांचा अभय असल्यामुळे ते बिनधास्त पणे खुलेआम गुटखा विक्री करीत आहेत, या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत,आणि त्या गुटखा माफियावंर मुरबाड पोलिसांना कडक कारवाई करण्यास भाग पाडू आणि कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू —–नरेश देसले, शिवसेना(उ.बा.ठा )कार्यकर्ते 000000

वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

    मुंबईः आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर…

 खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक कायम

४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सळुग- दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, :- उत्तरप्रदेशमधील अलिगड येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी दुहेरी विजय मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे. खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे या खेळातील महाराष्ट्राचा दबदबा-लौकिक कायम राखला गेला असून त्यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळेल आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील अभिमानास्पद कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उत्तरप्रदेशमधील अलिगडच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियम येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजयामुळे महाराष्ट्राच्या कुमार गटाचे सलग १९वे तर मुलींचे सलग १०वे अजिंक्यपद ठरले आहे, याचा सर्वच महाराष्ट्रीयन जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुमारांनी एकूण ३५ तर मुलींनी एकूण २६ वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले आहे, यातून खो-खो खेळातील महाराष्ट्राचा दबदबा, मेहनत, प्रावीण्य याची प्रचिती येते. या स्पर्धेत धाराशिवच्या जितेंद्र वसावे याला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रे हिला जानकी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. सर्वच विजयी खेळाडूंना, प्रशिक्षकांना उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 0000000

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सहा वर्षे अडगळीत,

रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर मुंबई : रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अडगळीत पडून आहे. पुतळा निर्मितीसाठी १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.…