अशोक गायकवाड
पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघात ज्या पद्धतीने आत्तापर्यत्त विकासाची कामे झाली. त्याच वेगाने येणाऱ्या काळात देखील तुम्हाला अपेक्षीत असलेली सर्व विकासाची कामे करण्यासाठी आपण ताकद द्यावी आणि महायुतीच्या सरकाराला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कमळा समोरील बटन दाबून विजयी करा, असे आवाहन पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. तसेच पनवेल विधानसभा मतदार संघाच्या अधिक सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आघाडी घेतली असून महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करत आहे. त्या अनुषंगाने पनवेल ग्रामीण भागातील कोळवाडी, पाले बुद्रुक, फणसवाडी, वलप, हेदुटणे, कानपोली, खैरणे, नितळस, वावंजे तसेच खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सबका साथ सबका विकास हे सुत्र घेऊन भाजप काम करते. ग्रामिण भागासह माहापलिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या तसेच त्यांच्या गरजा ओळखून आपण काम करत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात देखील त्याच वेगाने विकासकामे करणार अशी ग्वाही दिली. या प्रचारावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका अरुणा भगत, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, युवा नेते हैप्पी सिंग, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर, दशरथ म्हात्रे, सरपंच शैलेश माळी, प्रदीप भगत, राजेंद्र गोंधळी, प्रदीप माळी, दीपक उलवेकर, अशोक उलवेकर, निलेश दाढावकर, सागर सांगडे, सञ्जन पवार, ज्योत्सवका राजेश पाटील, नवनाथ महादू खुटारकर, रेश्मा रुपम गावंड, राजेश पाटील, अंकुश पाटील, परेश पाटील, बाळाराम पाटील, जगन्नाथ पाटील, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, बबन पाटील, किरण पाटील, नरेश पाटील, चंद्रकांत पाटील, बाळाराम पाटील, आत्माराम पाटील, संदेश पाटील, स्वामी पाटील, हरिश्चंद्र खाडेकर, नारायण खाडेकर, सोपान खाडेकर, केशव टेंभे, आत्माराम टेंभे, रामदास टेंभे, गोटीराम पाटील, चंद्रकांत वनगे, सदानंद वनगे, विश्वनाथ म्हात्रे, प्रमोद उसाटकर, योगेश पाटील, चेतन पाटील, जयराज पाटील, समीर पाटील, ओंकार रॉय, स्वप्नील पाटील, प्रताप पाटील, वैभव पाटील, विवेक पाटील, आशिष पाटील, निलेश, खुटारकर, प्रतिक पाटील, निखिल पाटील, जयदीप टेंभे, वैभव उसाटकर, संगम भोईर, साहिल पाटील, पांडुरंग वाघे, सुरेश वाघे, रमेश वाघे, अनंता वाघे, सुधीर वाघे, यशवंत वाघे, रमेश स. वाघे, बाळकृष्ण पाटील, राजेश पाटील सभासद, आत्माराम खानावकर, उमेश पाटील, संतोष पाटील, सचिन जोशी, निवृत्ती पाटील, अभिमन्यू पाटील, प्रल्हाद साळुंखे, भामा उघाडा, शनिवार चौधरी, बुधाजीशेठ नारायण माळी, काशीनाथ गोंधळी, वामन कुंडलिक माळी, कृष्णा खंडू गोंधळी, अरविंद बंडू गोंधळी, अनिल बळीराम गोंधळी, ज्ञानदेव चंदर गोंधळी, गुरुनाथ बाळाराम गोंधळी, रमेश गोविंद माळी, प्रदीप वामन माळी, नरेश गोविंद माळी, चाहू नामा माळी, कृष्णा मारुती गोंधळी, धोंडीराम लक्ष्मण पाटील, शनिवार गोटीराम पाटील, जगदीश शांताराम गोंधळी, बबन नारायण गोंधळी, भास्कर बागल्या माळी, गणपत मढवी, वासुदेव माळी, रविंद्र गणपत गोंधळी, समाजसेविका हर्जिंदर कौर,युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, युवा मोर्चा चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अजय मोरे, युवा वरिअर्स कामोठे संयोजक सुयोग वाफारे, आकाश शिंदे तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0000