सिंधूदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा ‘ दक्षता पुरस्कार ‘ मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने स्पेशल ऑपरेशन ,इन्व्हेस्टिगेशन (तपास ),तसंच फॉरेन्सिक सायन्स, इंटेलिजन्स या चार विभागांसाठी दक्षता पुरस्कार दिले जातात.रावले याना तपासासाठी हा दक्षता पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्रीय गॄहमंत्रालयाचे उप -सचिव डी.के. घोष यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली.
स्पेशल ऑपरेशन या विभागातील पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण ३४८ जणाना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. इन्व्हेस्टिगेशन (तपास) या विभागासाठी १०७ जणाना पुरस्कार जाहीर झाले आहेत .तर फॉरेन्सिक विभागासाठी ८जणाना पुरस्कार जाहीर झाले आहेत.