देवगड : विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तालुक्यातल्या निसर्गरम्य कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर येत्या ८ ते ११ नोव्हेंबर रोजी ‘ रापण काहोत्सव ‘ आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या कालावधीत रोज सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत या महोत्सवात स्थानिकांना तसच येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक मासेमारीचा अनुभव घेता येणार आहेच शिवाय विविध खाद्य संसस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे.
पारंपरिक रापण महोत्सव समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.समितीचे उपाध्यक्ष प्रशांत शिंदे,सचिव रामदास तेजम,खजिनदार हेमंत वातकर,महेश ताम्हणकर,दीपिका मुणगेकर,अनंत वाळके,चंद्रकांत घाडी आदी उपस्थित होते.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट,कुणकेश्वर ग्रामपंचायत, कातवण ग्रामपचायत,कुणकेश्वर सेवा सोसायटी,देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भरविण्यात येत आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून समुद्रात रापण कशी लावतात,नंतर ती कशा पद्धतीनं ओढतात,मासे कसे जमा केले जातात याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. रापणीत मिळालेल्या ताज्या माशांचा लिलाव व विक्री कशी केली जाते याचा अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे.तसेच मिळालेल्या ताज्या माशांचे विविध पदार्थ चाकण्याची संधी मिळणार आहे.
‘खाद्य महोत्सव ‘ हा त्याचाच एक भाग आहे. माशांच्या विविध प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.त्याशिवाय मालवणी शाकाहारी व  इतर पदार्थ,कोकणी मेवा यांचेही स्टॉल असणार आहेत. या निमित्ताने राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तसेच सांस्कृतिक आर्यक्रम  हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *