एमसीए कांगा लीग क्रिकेट स्पर्धा
मुंबई : एमसीए डॉ. एच. डी. कांगा क्रिकेट लीग स्पर्धेच्या ‘ए’ डिव्हिजन सामन्यात डॉ. डी. वाय. पाटील एसएने परळ एससीवर निर्णायक विजय मिळवला. हिंदू जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात शनिवारी डॉ. डी. वाय. पाटील एसएने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५ बाद १७९ धावांवर घोषित केला. प्रणव केला याने ६४ धावांची नाबाद खेळी करत त्यात मोलाचे योगदान दिले. हर्षल जाधवने ४६ धावा करताना त्याला चांगली साथ दिली.
फलंदाजांनंतर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना परळ एससीला पहिल्या डावात अवघ्या ५७ धावांवर गुंडाळताना त्यांच्यावर फॉलोऑन लादला. त्यानंतर दुसऱ्या डावात प्रतिस्पर्धी संघाला ७८ धावांत गारद करताना एक डाव आणि ४४ धावांनी विजय मिळवला. कर्श कोठारीने (५/२३ आणि ६/२२) सामन्यात ११ विकेट घेत डॉ. डी. वाय. पाटील एसएचा विजय आणखी सुकर केला.
संक्षिप्त धावफलक (ए’ डिव्हिजन): डॉ. डी. वाय. पाटील एसए – 5 बाद 179 डाव घोषित(प्रणव केला 64*, हर्षल जाधव 46) वि. परळ एससी – पहिला डाव: सर्वबाद 57 (कर्श कोठारी 5/23, इक्बाल अब्दुल्ला 4/12) आणि दुसरा डाव – सर्वबाद 78(आशय दुबे 33, नमन झंवर 31; कर्श कोठारी 6/22, उमर खान 3/28). निकाल – डी. वाय. पाटील एसए एक डाव आणि ४४ धावांनी विजयी.
पारसी जिमखाना – 8 बाद 249 (जय जैन 71, केविन आल्मेडा 66, अंगकिर्श रघुवंशी 41; विजय गोहिल 4/55, अथर्व कर्डिले 3/93) वि. अपोलो सीसी – 7 बाद 186 (ओंकार उंबरकर 51, करन शाह 43, स्वप्नील प्रधान 41, शुभम पुण्यर्थी ३०; शम्स मुलानी ६/७०). निकाल – सामना अनिर्णित.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया 3 बाद 275 (आकाश पारकर 104*, आकाश आनंद 100*) वि. कर्नाटक एसए – 6 बाद 121 (गौरिश जाधव 40*; ध्रुमिल मटकर 3/26). निकाल – सामना अनिर्णित.
न्यू हिंद एससी – सर्वबाद 72(अथर्व भोसले 3/2, जुनेद खान 3/31) वि. पी. जे. हिंदू जिमखाना – 5 बाद 228 (सिद्धांत अधटराव 62, कौशिक चिखलीकर 56, गौतम वाघेला 53*; शंतनू कदम 3/57). निकाल – हिंदू जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.
शिवाजी पार्क जिमखाना – सर्वबाद 193(रझा मिर्झा 54; हिमांशू सिंग 5/50, विशाल दाभोळकर 4/60) वि. पार्कोफेन क्रिकेटर्स – 4 बाद 108 (प्रसाद पवार 32*). निकाल – सामना अनिर्णित.
नॅशनल सीसी – 6 बाद 254 (सिद्धार्थ म्हात्रे 101*, भूषण तळवडेकर 51; योगेश पाटील 3/71) वि. मुंबई पोलीस जिमखाना – 4 बाद 136 (रोहित पोळ 62*, हर्ष आघाव 50*). निकाल – सामना अनिर्णित.
व्हिक्टरी सीसी – 9 बाद 190 (सुवेद पारकर 35, जय बिस्ता 34, प्रग्नेश कानपिल्लेवार 33, हार्दिक तामोरे 31; हर्ष तन्ना 4/55) वि. एमआयजी क्रिकेट क्लब – 7 बाद 134 (गौरव जठार 44, वेदांत मुरकर 39; रॉयस्टन डायस 4/21). निकाल – सामना अनिर्णित.