रायगड : अशोक गायकवाड
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १८८-पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७०२१९७९४२२ असा आहे. ते १८८ -पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे दुपारी १.०० ते दुपारी २.०० या वेळेत भेटतील. तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.