प्रताप सरनाईक प्रचंड मतांनी विजयी होणार – एकनाथ शिंदे

ठाणे : ओवळा – माजीवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यतत्पर आमदार तसेच लोकप्रिय उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या गेल्या १५ वर्षातील विकासकामांचा आढावा घेणारा कार्य अहवाल व त्याची माहिती देणारे कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आले. ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा चौफेर विकासकामांमुळे आमदार सरनाईक यांनी बदलून टाकला आहे. आमदार सरनाईक हे पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हेही उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना आमदार सरनाईक यांनी दीपावलीच्या सहपरिवार शुभेच्छा दिल्या. ओवळा-माजिवाडा विधानसभा क्षेत्रातील गेल्या १५ वर्षांत दिलेल्या वचनांनुसार केलेल्या कामांचा कार्यअहवाल यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला तर विकासकामांची माहिती व पुढील ५ वर्षात मतदारसंघांत राबवायचे विकास प्रकल्प, संकल्प याचे कॉफी टेबल बुक अनावरण करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांना हे कॉफी टेबल बुक दिले जाणार आहे तर कार्य अहवाल मतदारांच्या घरोघर वाटप केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चौफेर विकासकामे ही ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात झाली आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत ओवळा-माजीवडा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या मतदारसंघात लोकोपयोगी विकासकामं आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. मीरा-भाईंदर शहरात देखील त्यांनी  विविध लोकोपयोगी कामे करून या शहराचा पूर्णपणे कायापालट केलेला आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या बळावर त्यांचा विजय होणे ही निव्वळ औपचारिकता असून या मतदारसंघातून ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *