सचिव बाबुराव चांदेरे यांची घोषणा
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पुढील वर्षी मे महिन्यात महाराष्ट्राची कबड्डी लीग घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली.
पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवार, दि. २३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत या विषयावर धोरणात्मक चर्चा करून मंजुरी घेण्यात आली. याबाबत चांदेरे यांनी सांगितले की, “लीगकरिता पुरुष आणि महिलांचे असे एकूण १६ संघ तयार करण्यात येतील. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. राज्यातील प्रो कबड्डी लीग खेळलेल्या खेळाडूंचाही या लीगमध्ये समावेश असेल. इतर राज्यातील (बाहेरील राज्यातील) एका खेळाडूस प्रत्येक संघात स्थान देण्यात येईल. राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांत ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धा साधारणत: पुढील वर्षाच्या मे महिन्यात घेण्याचा संघटनेचा मानस आहे. लीगचे नियम आणि अटी लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.”
चांदेरे पुढे म्हणाले की, “यापुढे खाजगी संस्थांना कबड्डी लीग घेण्यासाठी राज्यात परवानगी देण्यात येणार नाही.