राजेंद्र साळसकर

संगमनेर : ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, रायतवाडी फाटा, संगमनेर येथील आश्रमातील सर्व मुले व वयोवृद्ध तसेच नवजीवन वीट भट्टी उद्योगातील वंचित मुलांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.

स्वयंप्रेरित संस्थेच्या आश्रमातील मुले व वीटभट्टी वरील मुले अशा एकूण १०० मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.  ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनने आपली दिवाळी सर्व मुलांसमवेत साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला.

याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री दिपक पवार, राजेन्द्र पुजारी, अनंत खडतरे,जितेंद्र पवार,प्रभाकर कुटे, उदय पुजारी, अनिल माशिट्टे तसेच नवजीवन विटभट्टी उद्योगाचे मालक दिलीप शेठ जोर्वेकर स्वयंप्रेरीत संस्थेचे नामदेव राहणे, संतोष पवार, नवजीवन उद्योगातील परिवार इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *