अशोक गायकवाड

रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निवडणूक निरीक्षक रुही खान, सतिश कुमार एस आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मनुष्यबळाची दुसरी जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्र*क्रियेच्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकूण २ हजार ८२० मतदान केंद्रा करीता १४ हजार २१६ इतकी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात उपलब्ध कर्मचारी संख्या १५ हजार १६९ इतकी आहे. या सर्व कर्मचाऱयांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. १८८ पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण ६०४ मतदान केंद्र असून ३ हजार ७४ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी ३ हजार ४८७ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१८९ कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण ३६२ मतदान केंद्र असून १ हजार ९३४ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी १ हजार ९६१ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१९० उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३५५ मतदान केंद्र असून १ हजार ८६९ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी १ हजार ८९३ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१९१ पेण विधानसभा मतदार संघात एकूण ३८० मतदान केंद्र असून २ हजार २४ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी २ हजार ३६० मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१९२ अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण ३७५ मतदान केंद्र असून १ हजार ९८३ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी १ हजार ९९२ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण ३५१ मतदान केंद्र असून १ हजार ६५८ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी १ हजार ७३४ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.१९४ महाड विधानसभा मतदार संघात एकूण ३९३ मतदान केंद्र असून १ हजार ६७४ कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी १ हजार ७४० मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *