ठाणे : विहंग प्रतिष्ठान आणि नेहरुनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत नेहरुनगर कुर्ला येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या हस्ते होणार असून विश्वस्त राही भिडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदामंगल प्रकाशनच्या सहकार्याने नेहरुनगर नागरिक मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, नेहरुनगर, कुर्ला (पूर्व) येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून येथे ग्राहकांना सवलतीच्या दरामध्ये दिवाळी अंक खरेदी करता येतील. महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रकाशित झालेले दिवाळी अंक येथे पाहण्यास मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रसाद (९८६९०२०७२०), राजश्री (७७३८०५१४७), गिरीश (९७०२२०९९९९) यांच्याशी संपर्क साधावा.
