ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन,

 

मुंबई : जागतिक पातळीवरील सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय’ने अलीकडे आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले तर त्यांच्या कालनिर्णय सांस्कृतीक दिवांळी अंकाला ३६ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय पाकनिर्णय’ पाककला स्पर्धा तसेच ‘लघु लघुकथा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफिलीचे आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे करण्यात आले.
यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी कालनिर्णयचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या आईबाबांकडे मराठी कालनिर्णय असते तर सासूबाईकडे तमिल कालनिर्णय असते, असा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, कालनिर्णयचे सर्वसामान्यांशी शतकानुशतकांचे नाते आहे, अशीच सर्वांची भावना आहे. “कालनिर्णयला ५० वर्षे झाली आहेत, पण मला ते खरे वाटत नाही. कालनिर्णय त्याआधी नव्हते तर मग हे जग चालले कसे, असें प्रश्न पडतो आणि कालनिर्णय शतकानुशतके होते, अशीच आमची भावना आहे. कालनिर्णयने कोविडचा काळ सुखकर केला, आमच्या घरात आई-बाबा नातेविकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लिहून ठेवण्यासाठी आणि त्यानुसार शुभेच्छा देण्यासाठी कालनिर्णयचा वापर करतात. तारखांच्या मागचा मजकूर वाचनीय असतो आणि ते वाचत आम्ही मोठे झालो.” त्या म्हणाल्या.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, पाककलेबरोबर आपण पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करतो , हेद्धा महत्वाचे असते. “काहीवेळा नको तेवढे पदार्थ ताटात वाढून ठेवलेले असतात. पाहुण्यांना काय खावू आणि काय नको असे होते. त्याऐवजी मोजके आणि नेटके पदार्थ असतील तर त्याची रंगत काही और असते. प्रख्यात विदुषी आणि भाषांतरकार रेखा सबनीस यांच्या घरी जेवायला गेले असताना मला असा अनुभव आला,” त्या म्हणाल्या.
कालनिर्णय दिवाळी अंकाचे संपादक जयराज साळगावकर
म्हणाले, “दीवाळी अंकाचे अर्थकारण आणि वाचकांची मानसिकता या दोन्ही गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रकाशक आणि संपादकांपुधील एक मोठे कोडे आहे. दिवाळीतील उटणे, झेंडू फुले, मोती साबण यांप्रमाणे दिवाळी अंक एक कमॉडीटी झाली आहे. सुसंस्कृत वाचक कमी झाले आहेत. चांगला मजकूर देवूनही लोक हल्ली वाचत नाहीत. आणि हे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. दिवाळी अंक बंद पडतील असे नाही पण ते बंद पडू नयेत म्हणून आपण या अंकांचा फॉर्म मात्र बदलायला हवा. म्हणूनच आम्हीं यंदाच्या दिवाळी अंकात लघुकथा द्यायचे ठरवले. पूर्णि टके बंद पडत होती, पण त्या क्षेत्रात काही चांगले प्रयोग झाले आणि नाटके सर्व्हाइव्ह झाली आहेत.”
साळगावकर पुढे म्हणाले, “वाचाकाशिवाय लेखकाला किंमत नाही. वाचक हा खऱ्या अर्थाने चालक असतो. अपनील मराठी संस्कृती अशी की आर्थिक अद्चानिठी उत्साहाने नवनवीन दिवाळी अंक येतात. ते एक व्यासपीठ आहे आणि ते जिवंत राहिले पाहिजे आणि तसे होईल याची मला पूर्ण खात्री आहे. गेली  ३६ वर्षे आम्ही कालनिर्णय दिवाळी अंक काढतो आहे. खर्च खूप होतो पण तोटा होत नाहीत, नफा कमी प्रमाणात होतो, अशी परिस्थिती आहे.”
कालनिर्णय प्रकाशनच्या शक्ती साळगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले, “आमचे परीक्षक आणि  स्पर्धक यांच्याकडून अम्हालाक खूप प्रेम मिळाले आणि त्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. हेतू पाककृती शोधणे आणि त्यातील उत्कुष्ट पाककृतींचा गौरव करणे यासाठी हे आयोजन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत इंस्टंट मिक्सेस खूप लोकप्रिय झाली. युध्यात गेलेल्या पुरुषांच्या गैरहजेरीत मुले व स्त्रियाना घराबाहेर पडावे लागत होते आणि त्यामुळे स्वयाम्पाकाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे इंस्टंट फूडकडे घरांचा कल वाढू लागला. प्रत्येक पाककृती ही त्या त्या वेळच्या संस्कृतीचा अभ्यास करते. खाद्यसंस्कृती ही त्यावेळच्या सामाजीक, वैचारिक आणि आर्थिक परीस्थितीचा आढावा घेत असते. या खाद्यसंस्कृतीचे आणि आमचं पाककृती स्पर्धेचे कर्तेधर्ते स्पर्धक आणि परीक्षक आहेत.”
‘कालनिर्णय’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ‘कालनिर्णय पाकनिर्णय २०२४’  तसेच ‘लघु लघुकथा’ या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ या सोहळ्यात आयोजित करण्यात आला. तसेच  ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४’चे प्रकाशनही यावेळी झाले.
यावेळी  ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ ही मराठी भावगीतांची सांगीतिक मैफिल पार पडली. त्यालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांगीतिक मैफलीमध्ये मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे या गायक कलाकारांनी गाणी सादर केली. कुणाल रेगे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *