नाशिक : काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. इतर पक्षांच्या पायघड्यांवरच ती जिवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. नाशिक येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी राममंदिराच्या आठवणींना उजाळा दिला. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी ११ दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती.  काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.

भाजपा हा जनतेसमोर आपली कामं दाखवत निवडणुकीत जात असतो मात्र काँग्रेसकडे आता एकच पर्याय आहे. काँग्रेसची खोटं बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि चेल्यांनी हे दुकान महाराष्ट्रात लावलंय. कर्नाटक, हिमाचलमध्ये हेच केलं आणि तिथे काय झालं? निवडणुका संपल्या आणि दुकान बंद झालं तेव्हा केलेल्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या. सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जनतेवर कर लादला जातोय. जनता यांची खरी खोटी जाणते. महायुतीचं घोषणापत्र एका बाजूला आणि दुसरीकडे मविआचे घोटाळा पत्र आहे.  काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही आहे ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जीवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी काँग्रेसने आपला हत्यार चालवलं आहे. एससी, एसटी ओबीसींची एकता तोडा आणि राज्य मिळवा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र विकास करतोय. देश नवे रेकोर्ड बनवतोय. देशात गरिबांची चिंता करणारं हे सरकार आहे. गरीब पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, लोकांच्या पदरी काही पडलं नाही. १० वर्षात २५ कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले आहेत. हे शक्य झालं कारण मोदी की नियत सही है. मोदी सेवक बनून काम करतो. हे शक्य झालं कारण गरीबी विरोधातली लढाई सर्वांनी लढली. ५० लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनांचे गॅस कनेक्शन आहेत.  नल-जल सुविधा मिळाली आहे.  ७ कोटी लोकांना अन्नधान्य मिळतंय. गरिबांसाठी चांगले काम होत आहे, ही कामे पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकार बनवणं गरजेचं आहे.  डबल इंजिनमध्ये विकास डबल होतो. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन होणार तेव्हा ही मदत १५ हजार रुपयांची केली जाणार आहे.

सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादकांना देखील मदत केली गेली आहे. देशाचा रुपया विदेशात गेला तो आता शेतकऱ्यांना मिळतोय त्यांना जातोय.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना समजतो, धोरण आपण बदलली आहेत.  महाराष्ट्र वेगानं पुढे जाणं गरजेचं आहे.  महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हा देश पुढे जाईल. मागील अडीच वर्षात ते महायुतीने दाखवलं आहे. अनेक प्रकल्प बनवण्यात महाराष्ट्र पुढे आहे. तंत्रज्ञानात निधी येतोय.  मात्र सरकार आले नाही तर प्रगती होईल का? महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराचे अवसर मिळणार का? आपण खूप मागे जाऊ. मेट्रो थांबवली, समृद्धी महामार्ग थांबवण्याची कामं केली, अटल सेतूमध्ये अडथळा आणला. प्रकल्प थांबवण्यात मविआ आघाडीवर आहे. आघाडी वाल्यांना सरकारपासून दूर ठेवा.  महायुती सरकारनं विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला देखील मोठं महत्त्व मिळालं आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. २०२६ च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठं केंद्र देखील बनतोय.  नाशकात सुरक्षेची उपकरणं बनवली जात आहेत.  नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  काँग्रेस आणि आघाडीवाले लोकं आहेत, ते देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.  डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी एचएएलसंदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले.  मात्र एचएएल रेकॉर्ड ब्रेक कामं करत आहे.  नाशिक त्याचे परिणाम बघत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *