अनिल ठाणेकर
ठाणे : अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हाप्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, गणेश साळवी, गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजितदादा पवार यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. लोकांचे विकासकामे होण्यासाठी लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला निवडून येणे गरजेचे आहे. नजीब मुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.१४९ – मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे (शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची गुरुवारी प्रभाग क्रमांक २३, शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकभाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून सुरु होऊन मनिषा नगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटीमार्गे, गावदेवी मंदिर-शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक , शिवसेना मध्यवर्ती शाखा,कळवा नाका येथे समारोप करण्यात आला.
