सांगली : शरद पवार स्वताला शेतकऱ्यांचे मसीहा मानतात पण मोदींनी शेतकऱ्यांना ६००० रुपये देण्याचं काम केलं. शरद पवार यांनी दहा वर्षे सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय दिले हे सांगावं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.सांगलीमधील शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ बोलताना अमित शाह यांनी शिराळच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक बनवू अशी घोषणा केली.

त्यांनी सांगितले की, २० तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. आपल्या सगळ्यांना निर्णनायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे. देवेंद्र आणि एकनाथ यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता १५०० नंतर २१०० रुपये महिला दिलं जाणार असल्याचे ते म्हणाले.

अमित शाह यांनी बोलताना सांगितले की राम मंदिराचा मुद्दा 75 वर्ष काँग्रेसने भिजत ठेवला होता, पण मोदींनी पाच वर्षांमध्ये मंदिर उभा केलं आहे. राम मंदिरात शरद पवार, उद्धव ठाकरे जाणार होते, राहुल गांधी सुद्धा जाणार होते, पण यांची व्होट बँक वाचवण्यासाठी ते अजून अयोध्येला गेले नाहीत, अशी टीका अमित शाह यांनी केली. ते पुढे म्हणाले की नागपूजा परंपरागत पुन्हा चालू होईल. महाविकास आघाडीवाले वक्फ बोर्डाकडे जमीन देण्याचं काम करतील. पण जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत मंदिर आणि मंदिराच्या जमिनीला कुणाला हात लावू देणार नाही. अमित शाह म्हणाले की, औरंगाबादचे नाव संभाजी नगर व्हायला पाहिजे की नको? पण हे महाविकास आघाडी वाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे देखील याला विरोध करत आहेत. मी इथून शरद पवार यांना सांगतो की, औरंगाबादचे नाव वीर संभाजीनगर होणार. शरद पवार ऐका तुमच्या चार पिढी आली तरी 370 कलम बदलणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *