अनिल ठाणेकर

ठाणे : प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह केला. प्रताप सरनाईक यांनी देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करून त्यांनी दिलेला सन्मान आनंदाने स्वीकारला.

तुम्हारा चुनाव चिन्ह हमे पता है, तुमने बहोत काम किया है; हम धनुष्यबाण को ही मत देंगे”, हा संवाद आहे, घोडबंदर येथील; एक ज्येष्ठ महिला आणि प्रताप सरनाईक यांच्यातील. महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रचारार्थ वाघबीळ नाका, डीमार्ट, हिल स्प्रिंग, हावरे सिटी, ओवळा नाका, भायंदर पाडा, गायमुख, मोघर पाडा, कोळीवाडा, राम मंदिर, ट्रॅफिक पार्क, न्यू होरीझन स्कुल, वाघबीळ गाव, वसंत लीला, विजय एनेक्स, विजय गार्डन, स्वस्तिक रेसिडेन्सी, आनंद नगर नाका, वाघबीळ नाका, कापुरबावडी, माजिवडा गाव आदी ठिकाणांहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.ही प्रचार रॅली ज्या गल्लीत , ज्या भागात जात होती. त्या भागात नागरिकांकडून प्रताप सरनाईक यांचे जोरदार स्वागत केले जात होते.  सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पुष्पवृष्टी केली. प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या देखील काढल्या होत्या. पक्षाचे चिन्ह रांगोळी म्हणून काढले होते. “तुम्ही आम्हाला तुमच्या कामांतून दररोज दिसत असता. आमच्या परिसराचा कायापालट तुम्हीच केला आहे. त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत; विजय तुमचाच आहे,” असे म्हणत नागरिकांनी प्रताप सरनाईक यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सर्वच समाजातील विविध स्तरातील नागरिक, तरूण, वृद्ध, महिला या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सर्वांचे मिळणारे प्रेम आणि पाठिंबा पाहून समाधान वाटते असा विश्वास यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. आपल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे, मी पुन्हा एकदा तुमच्या सेवेत येईल आणि सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघाचा अजून वेगाने विकास करू. तुमच्या सेवेत पुन्हा दाखल होईल असा विश्वास तुमच्या सर्वांकडून मिळणाऱ्या प्रेमाने आणि आपुलकीने मनात निर्माण होतो अशा भावना यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *