दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वर्धापनदिन संगीत महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव संस्थेच्या वा . वा . गोखले (वातानुकूलित ) सभागृहात होणार आहे. शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आग्रा , ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची असून संवादिनी वर ओंकार अग्निहोत्री आणि सारंगीवर गुरुप्रसाद हेगडे  साथ करणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता पं . पन्नालाल घोष घराण्याचे बासरीवादक पं. सुदीप चट्टोपाध्याय यांचे बासरीवादन होणार असून त्यांना तबल्यावर साथीला आहेत पं. अनुतोष देघारिया. महोत्सवाचा समारोप रविवार दिनांक १७ नोव्हेंबर या दिवशी होत असून सायंकाळी पाच वाजता बनारस घराण्याचे सुविख्यात गायक पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे . त्यांना स्वरसाथ स्वरांश मिश्रा करणार असून तबला साथ मंदार पुराणिक आणि संवादिनी साथ सिध्देश बिचोळकर करणार आहेत. संस्थेतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना या महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *