चंद्रपुर : महाविकास आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खिलाडी आहे असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. चिमुर येथी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी हे आरोप केले.
महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात पीएचडी केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. महाविकास आघाडीने फक्त ब्रेकिंगच्या कामात पीएचडी केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसनं दुप्पट पीएचडी केली असंही ते म्हणाले. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. हे काँग्रेसी लोक यात निष्णात आहेत. वर्षानुवर्षे प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा आरोपही मोदींनी केला.
पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारले की चिंबूरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
येत्या पाच वर्षात भाजपचा जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. आज मला महाराष्ट्र भाजपचे अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी म्हणाले.
जय शिवराय, जय विठ्ठल…
पुणे येथे आयोजित भव्य प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरींची पगडी आणि हाती शिवरायांची मुर्ती घेत जय शिवराय, जय विठ्ठलचा नारा दिला…
