ठाणे : स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे आवासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले. यावेळी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा हे ही उपस्थित होते.
महाआघाडीच्या वचननाम्यात घरातील सर्व मताभगिनी असलेल्या भाग्यलक्ष्मींना तीन हजार रुपये दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे, २५ लाखाचा विमा देण्याचे आमचे वचन आहे., तीन लाखांपर्यंतचे शेतकर्यांचे कर्ज माफ केले जाणार आह,जातीय निहाय जनगणना केली जाणार आहे. कंपन्या बंद पडल्याने स्थानिकांच रोजगार बुडाला, स्थानिकांचे रेतीचे व्यवसाय बंद पाडून आमच्या रेतीच्या प्लाॅटवर चौपाटी करुन आमच्या पोटावर बुलडोझर चालवले जात आहेत. क्लस्टरचे डेव्हलपमेंट करताना हजार दोन हजार फुटाच्या घराला साडेतीनशे फूटाचे घर देणार असाल तर हा कुठला न्याय ? अश्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध आहे. शहराचा विकास होताना विकास कामात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. ज्याच्यामुळे स्थानिक तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल असा १५ वर्षात असा एकही प्रकल्प या मतदारसंघात आला नाही. ४० वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्या पस्तीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या नरेश मणेरा या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे. नरेश मणेरा यांच्याविषयी लोकांचा उत्सर्त प्रतिसाद पहावयास मिळाली.स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आवाहन करेन की आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केले.
