मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन

 

पालघर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तिकीटावरून विविध पक्षांमध्ये झालेले वाद सर्वांनी पाहिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. तिकीटावरून एवढा वाद सुरू असताना अनेक नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे निश्चित होते. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा “कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधीकधी गणितं असतात. परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. म्हणून मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे. काही लोकांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकलो नाही पण त्यांना मी ताबडतोब विधान परिषदेमध्ये सदस्य बनवलं आणि आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे. श्रीनिवास माझ्यासोबत होता. मी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला त्याने काहीही विचारलं नाही. मुलाचा वाढदिवस देखील त्याने बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास राजेंद्र गावित यांच्यासाठी स्टेजवर आला आहे. श्रीनिवास यांचे चांगले होणार आहे कल्याण होणार आहे. त्याला कुठे बघण्याची गरज लागणार नाही,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *