न्या. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं सांगतानाच या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा डाव होता स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी सपशेल फेटाळला आहे.
सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती, अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिलं नाही असे चांदीवाल म्हणाले.
