अनिल ठाणेकर
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश मणेरा यांच्या निवडणुक प्रचारार्थ निष्ठावंत शिवसैनिक सरसावलेत, अशी माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रातील उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. भास्कर बैरीशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच शिवाईनगर परिसरामध्ये प्रचार पदयात्रा निघाली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उबाठा महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, युवा सेना सरचिटणीस सागर बैरीशेट्टी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
हिरानंदानी मेडोस, ठामपा शाळा,लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, व्होल्टास कॉलनी, नवीन म्हाडा कॉलनी, शिवाईनगर भारत सहकारी बैंक, पवार नगर बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळा, हनुमान मंदिर, कोकणीपाडा शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, गावंड बाग, उन्नती गार्डन, रवी इस्टेट, साईबाबा मंदिर रोड, विक्रांत चव्हाण ऑफीस वर्तकनगर, शास्त्री नगर, देवदया नगर ते शिवाईनगर या मार्गावरून महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, ओवळा माजीवडा विधानसभेचे उमेदवार नरेश मणेरा यांच्या निवडणुक प्रचारार्थ भास्कर बैरीशेट्टी यांची शिवाईनगरमध्ये प्रचार पदयात्रा काढली.
००००
