अनिल ठाणेकर
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांनी ‘निष्ठा हीच प्रतिष्ठा’ हा नारा देत आपल्या प्रचाराची मध्यवर्ती संकल्पना मतदारांसमोर मांडली आहे.
लोकसभेला जिल्यातील तीन जागांपैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला न सोडून काँग्रेसवर अन्याय करण्यात आला होता. विधिनसभेला अन्याय केला होणार नाही असा शब्द काँग्रेस वरिष्ठांकडून देण्यात आल्याने लोकसभेत आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला पण विधानसभा निवडणुकीतही ठाणे शहरातील चार जागांपैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोडण्यात न आल्याने काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अखेर कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून थेट महायुतीचे उमेदवार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याविरुद्ध काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो आहे. माझ्या या निर्णयाला काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच मतदारही मोठ्या उत्साहात माझे स्वागत करताना दिसतात यामुळे ‘निष्ठा हीच प्रतिष्ठा’ हा नारा देत आपल्या प्रचाराची मध्यवर्ती संकल्पना मतदारांसमोर मांडली आहे. असे मत मनोज शिंदे यांनी व्यक्त केले. बुधवारी मनोज शिंदे यांची प्रचार रॅली, किसन नगर, बलसारा कंपनी येथून सुरु होऊन रोड नंबर १६ बस स्टॉप, बाळा घाग ऑफिस, मानव हॉस्पिटल मार्गे भटवाडी, गार्डन हॉटेल, म्हावीस मेडिकल, साईराज इमारत मार्गे एकता पतपेढी ते मच्छिमार्केट व आजूबाजूचा परिसर येथील मतदारांची भेट घेतली. या प्रचार यात्रेतील निष्ठवंतांची ऊर्जा आणि उत्साह भारावून टाकणारा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *