जिंतूर : महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो. येत्या २३ तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सांगायला आलोय. आघाडी सरकारने काय केलं याची लिस्ट घेऊन या. जिंतूरकरांनो दहा वर्षांपर्यंत शरद पवार केंद्रात मंत्री होते, सोनिया -मनमोहन यांचं सरकार होतं. १० वर्षात महाराष्ट्राला केवळ एक लाख ९१ हजार करोड रुपये मिळाले. मोदीजींनी १४ ते २४ मध्ये एक लाख ९१ हजार करोडच्या समोर दहा लाख पंधरा हजार कोटी रुपये विकास निधी दिला.
२५ लाख रोजगार देणार आहोत. ४५ हजार गावांमध्ये पक्के रस्ते बनवणार आहोत. वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार याची गॅरंटी मी देतो असेही शाह म्हणाले.
