अनिल ठाणेकर
ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशाद नगर, मुंब्रा येथे मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे,राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तुमामा आदी मान्यवर उपस्थित होते.
जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे.कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप बरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. पण नंतर दादाच्या भितीने सही केली अशी पलटी मारली. टोरन्ट कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा मग मीही टोरन्ट कंपनीला ठेवणार नाही असे वचन देतो. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मासिक १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देम्याचे जाहीर केले आहे.पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली तेथील निवडणूका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे.महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
चौकट
जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पाॅवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाहीत उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी विद्यमान आमदाराचा पराभव करून मला निवडून द्या असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले.
0000