सातारा २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तत्कालीन शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे मोदी लाट असतानाही उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला  होता. त्या सभेची आजही राज्यात चवीने चर्चा केली जाते. दरम्यान, आज शरद पवारांच्या इचलकरंजीतील पावासातील सभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही भर पावासत सभा घेत आता पावसात जिंकलो म्हणजे ही जागा जिंकलोच, हा शुभशकून असल्याचे सांगताच भर सभेत विजेचा गडगडाटालाही लाजवेल असा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आज बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अचानक पाऊस सुरू झाला. या पावसातदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. “या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घोतोय ना? पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे,” असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणतात, “काही नेत्यांचं म्हणणं आहे की, पावसात सभा झाली की निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण आपल्या महायुतीसाठी मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सत्यजीत देशमुखांच्या रुपात आपल्याला सुसंस्कृत नेता आणि जमीनीवर काम करणारा नेता मिळाला आहे. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती सरकारणे आणली होती. पण त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत योजना बंद पडली. त्याकाळी जयंत पाटील पालकमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी या प्रकल्पासाठी फुटकी कवडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि एका झटक्यात १०० कोटी रुपये या योजनेसाठी दिले,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

चौकट

पावासानंतर फडणवीसांची

फेसबूकवरून शेरोशायरी…

भर पावसात सभा घेतल्यानंतर भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला भर सभेतील फोटो फेसबूकवरून शेअर करीत तुफानाला सामोरे जाण्याची जिगर राखतो अशा आशयाची शायरी पोस्ट केली. दै. बित्तंबातमीच्या वाचकांसाठी ही शायरी जशीच्या तशी…

तूफानों से आँख मिलाओ,

सैलाबों पर वार करो,
मल्लाहों का चक्कर छोड़ो,

तैर के दरिया पार करो।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *