मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
मुंबई, 15 नोव्हेंबर: राहुल सचदेवने सर्वोत्तम खेळ करताना मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेतील बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेम ’15-रेड’ स्नूकर राऊंड-रॉबिन सामन्यात अनंत मेहताविरुद्ध 3-1 असा विजय नोंदवला.
एमईचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत डावखुरा क्युईस्ट सचदेवने पहिल्या आणि दुसऱ्या फ्रेममध्ये 65 आणि 56 असे दोन अर्धशतकी तसेच 70-0, 18-61, 62-47 आणि 38-20 असे ब्रेक केले. मेहताने दुसरी फ्रेम जिंकताना पुनरागमनाचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्याला सातत्य राखता आले नाही.
दरम्यान, युधिष्ठिर जयसिंगने (क गट) निखिल आहुजाचा 3-1 (34-77, 65-28, 59-36, 65-20) असा पराभव करताना सलग तिसरा विजय नोंदवला. तसेच बाद फेरीसाठी प्रबळ दावेदारी पेश केली.
रंगतदार लढतीत ठाण्याचा क्यूईस्ट अनुज अग्रवालने मराठवाड्याच्या स्वप्नील पाटीलवर 3-2 (54-22, 60-19, 47-73, 33-61, 47-14) अशी मात केली.
निकाल – १५-रेड स्नूकर : शाहयान राझमी विजयी वि. कृष्णा तोहगावकर (ठाणे) ३-१ (६५-४८, ४६-५०, ६३-३८, ५८-३६);
सुमीत आहुजा (उल्हासनगर) विजयी वि. गौरव जयसिंघानी (वाशी) ३-१ (४३-५२, ६७-३४, ६५-४९, ६५-३४);
निखिल सैगल विजयी वि. अनुराग शर्मा (मराठवाडा) ३-० (७६-१६, ५८-४८, ५७-२५);
सोनू मातंग (पुणे) विजयी वि. प्रशांत डुंभेरे 3-0 (79(56)-11, 77-3, 63-25;
अभिषेक बजाज विजयी वि. पियुष लिंबड ३-१ (४०-५९, ४७-३७, ६०-३४, ९९(३१)-२४);
अभिजीत रानडे (पुणे) विजयी वि. अक्षय वाघचौरे (नाशिक) 3-0 (66-62, 60-19, 61-39);
आदित राजा विजयी वि. ऋषभ जैन 3-2 (82-42, 34-73, 58-39, 50-65(54), 82-79;
जुबेर शेख (नागपूर) विजयी वि. चिराग रामकृष्णन 3-0 (54-21, 58 (32)-54, 58-48;
सुनील जैन विजयी वि. चेतन राजरवाल (मराठवाडा) 3-0 (67-29, 73-17, 80-21).
0000
