प्राइम ब्रिज मिश्र सांघिक स्पर्धा

 

मुंबई : टीम सरला फायबर्सने विजयी फॉर्म कायम राखताना ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आणि ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बे जिमखानाआयोजित प्राइम सिक्युरिटीज-राष्ट्रीय रँकिंग ब्रिज 2024 स्पर्धेच्या मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची गाठ टीम हार्मनीशी गाठ पडेल.
उपांत्य फेरीत सरला फायबर्स आणि हेक्सा स्क्वॉड यांच्यात चुरशीची लढत झाली. सरला फायबर्सने तिसर्‍या आणि शेवटच्या सत्रात उत्तम प्रकारे एकत्रितपणे 17 आयएमपीज्जिंकून 19.5 आयएमपीज्नी अंतिम फेरीत स्थान मिळवले.
टीम हार्मनीने सुरेख कामगिरीसह टीम जेसलचा 20 आयएमपीज्नी पराभव केला. हार्मनीने 28 आयएमपीज्सह दुसर्‍या सत्रात वर्चस्व राखले. त्यामुळे त्याचा फायनलमध्ये प्रवेश निश्चित होण्यास मदत झाली.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत सरला फायबर्सने 38 आयएमपीज्सह टीम वॉरियर्सचा पराभव केला. टीम जेसलने टीम स्नॅपड्रॅगन 24.5 आयएमपीज्वर मात केली. हार्मनीने टीम स्लॅमर्सचा 25 आयएमपीज् आणि हेक्झा स्क्वॉडने एसिंग इटवर 30.5 आयएमपीज्नी मात केली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *