जैन इरिगेशनचा रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय

मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कार्पोरेट ट्रॉफी टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनमध्ये जैन इरिगेशन अ संघाने रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय मिळवला.

वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात रूट मोबाईलने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्ध्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 218 धावा केल्या. त्यात सलामीवीर, कर्णधार जय बिश्तचे (53 चेंडूंत 85 धावा, 6 चौकार, 5 षटकार) सर्वाधिक योगदान राहिले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील अनुक्रमे साईराज पाटील (23 चेंडूंत 47 धावा, 1 चौकार, 5 षटकार) आणि आयुष झिमरेची (21 चेंडूंत 45 धावा, 4 चौकार, 3 षटकार) त्याला चांगली साथ लाभली. रूट मोबाईलकडून सक्षम झा (3-31) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

जैन इरिगेशनच्या आव्हानाचा पाठलाग करताना रूट मोबाईल संघाची मजल 20 षटकांत 6 बाद 208 धावांपर्यंत गेली. सलामीवीर, यष्टिरक्षक ध्रुमिल मटकर  (36 चेंडूंत 55 धावा, 8 चौकार, 1 षटकार) आणि भार्गव पाटीलच्या  (28 चेंडूंत 46 धावा) अवघ्या 8.4 षटकांतील 81 धावांच्या झटपट सलामीनंतरही मधल्या फळीतील उमेश गुर्जरने (21 चेंडूंत 38 धावा. 3 चौकार, 2 षटकार) थोडा प्रतिकार केला तरी अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना विजयापासून वंचित राहावे. जैन इरिगेशनकडून जगदीश झोपे (3-34) आणि प्रशांत सोळंकीने (2-37) अचूक मारा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *